अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी ‘या’ लोकांना पाठवले स्पेशल गिफ्ट, आभार मानत खास..

| Updated on: May 14, 2024 | 12:33 PM

बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे कायमच चर्चेत असतात. अनुष्का शर्मा हिची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनुष्का शर्मा ही मुलगा अकाय याच्या जन्मानंतर भारतामध्ये परतली आहे. अनुष्का शर्मा भारतामध्ये आल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच सकिय दिसतंय.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी या लोकांना पाठवले स्पेशल गिफ्ट, आभार मानत खास..
Anushka Sharma and Virat Kohli
Follow us on

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे कायमच चर्चेत असतात. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओमध्ये चक्क सामना संपल्यानंतर मैदानातूनच पत्नीची आरती करताना विराट कोहली हा दिसला. मात्र, विराटचे हे करणे लोकांना अजिबातच आवडले नव्हते. या व्हिडीओनंतर दोघांनाही लोक खडेबोल सुनावताना दिसले होते. विराट कोहली नेहमीच मैदानातून अनुष्का शर्माला बोलताना देखील दिसतो.

अनुष्का शर्मा हिने काही दिवसांपूर्वीच अकायला जन्म दिला. लंडनमध्येच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आपल्या लेकाचे वेलकम केले. त्यानंतर आता भारतामध्ये अनुष्का शर्मा ही परतलीये. नेहमीच आपल्या मुलाला आणि मुलीला कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दिसतात. सोशल मीडियावरही ते मुलांचे फोटो शेअर करत नाहीत.

आता नुकताच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी पापाराझी यांना अत्यंत खास असे गिफ्ट पाठवले आहेत. फक्त गिफ्टच नाही तर त्यांनी या गिफ्टसोबत खास मेसेज देखील दिलाय. पापाराझी यांचे धन्यवाद मानताना अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दिसत आहेत. अनेक गिफ्ट अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून पापाराझी यांच्यासाठी पाठवण्यात आलेत.

अनुष्का आणि विराटने पाठवलेल्या गिफ्ट हॅम्परसोबत खास मेसेज दिलाय, त्यामध्ये लिहिले की, आमच्या मुलांची गोपनीयता राखल्याबद्दल आणि नेहमीच सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.. लव्ह अनुष्का-विराट. या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी पापाराझी यांना पाठवलेल्या गिफ्ट हॅम्परचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. स्मार्ट वाॅच सारखे अनेक गिफ्ट त्यामध्ये दिसत आहेत.

नेहमीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे कुठेही स्पाॅट झाले, तरीही ते पापाराझी यांना फोटो न घेण्यास सांगतात. हेच नाही तर बऱ्याच वेळा मुलांना गाडीत ठेवून ते फोटोसाठी पोझ देताना देखील दिसतात. लंडनहून भारतामध्ये अनुष्का शर्मा ही पोहचली. त्यावेळी अनुष्का शर्मा हिच्यासोबत अकाय होता. त्यावेळी अनुष्का ही पापाराझी न काढण्यास सांगताना दिसली होती.