न्यूयॉर्कच्या क्रिकेट स्टेडियमवर T20 वर्ल्ड कपचा भारत-पाकिस्तानचा सामना झाला. T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत काल भारत पाकिस्तानमध्ये रोमांचक सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला 19 षटकांत 120 धावांचे लक्ष्य दिले. हा सामना नक्कीच रोमांचक झाला. शेवटपर्यंत भारतीयांमध्ये धाकधूक बघायला मिळाली. शेवटी पाकिस्तानला धूळ चारत भारताने हा सामना जिंकला. पाकिस्तानने या सामन्यात दमदार सुरूवात केली होती. मात्र, तरीही त्यांना लक्ष्य गाठता आले नाही.
विशेष म्हणजे भारताने 6 धावांनी या सामन्यात विजय मिळवा. T20 वर्ल्ड कपच्या सामन्यात भारताने तब्बल सातव्यावेळी पाकिस्तानचा पराभव केला हे सर्वात विशेष. या सामन्यात विराट कोहली हा 4 धावांवर बाद झाला. यानंतर अनुष्का शर्मा ही निराश झाल्याचे स्टेडियममध्ये बघायला मिळाले. अनुष्का शर्मा ही विराट कोहली याला सपोर्ट करण्यासाठी पोहचली होती.
आता सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराटच्या चाहत्यांना अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ प्रचंड आवडल्याचे देखील बघायला मिळतंय. भारताने हा सामना जिंकल्यानंतरचा अनुष्का शर्मा हिचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
Such a cutieee😭❤️#ViratKohli #AnushkaSharma #Virushka #INDvsPAK pic.twitter.com/QWUDq471iR
— 𝗿𝗶𝗶𝘆𝗮𝗮𝗮💌 (@riyaa__99) June 9, 2024
या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा ही आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहे. अनुष्का शर्मा डाळ्या वाजून आनंद व्यक्त करताना दिसतंय. यासोबतच अनुष्का शर्मा हिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर देखील स्पष्ट दिसत आहे. अनुष्का शर्मा हिचा हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडताना दिसत आहे. अनुष्का शर्मा हिच्या या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
अनुष्का शर्मा हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, किती क्यूट दिसत आहे अनुष्का, दुसऱ्याने लिहिले की, असेच आनंदात राहा. तिसऱ्याने लिहिले की, बऱ्याच दिवसांनी अनुष्का शर्माला असे सेलिब्रेशन स्टेडियममध्ये करण्याची संधी मिळाली आहे. आता अनुष्का शर्माचे स्टेडियममधील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.