IPS Success Story : बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत अशी बनली IPS अधिकारी

| Updated on: Nov 12, 2024 | 4:52 PM

UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. पण यामध्ये काही लोकांनाच यश मिळतं. IPS अधिकारी होण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण यासाठी जिद्द आणि सातत्य खूप महत्त्वाचे असते. आज आम्ही तुम्हाला एका अशा आयपीएस अधिकाऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्यांनी अभिनयाने देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

IPS Success Story : बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत अशी बनली IPS अधिकारी
Follow us on

IPS Simala Prasad Success Story : UPSC परीक्षा उत्तीर्ण होणे हे काही सोपे काम नाही. त्यासाठी अभ्यास तर लागतोच पण सोबत जिद्द आणि चिकाटी देखील लागते. IPS अधिकारी झाल्यानंतर यांचे प्रशिक्षण पूर्ण करणे हे देखील अवघड काम आहे. पण काही लोकांचं ते ध्येय असतं आणि ते ध्येय ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. यश मिळवणं ही सर्वांसाठीच समान गोष्ट नसते. पण मध्य प्रदेशातील भोपाळच्या  IPS अधिकारी सिमाला प्रसाद यांनी देखील ही यशस्वी कामगिरी करुन दाखवली आहे. याशिवाय त्यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम करून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

2010 च्या बॅचच्या अधिकारी

बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणे हे कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्यासाठी खूप आव्हानात्मक काम असते. पण 2010 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद यांनी हे काम यशस्वी केले आहे. आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

सिमाला प्रसाद यांचा जन्म 08 ऑक्टोबर 1980 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. शालेय जीवनापासून त्यांनी नृत्य आणि अभिनयाची आवड जोपासली. त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. महाविद्यालयीन काळात अनेक नाटकांमध्येही काम केले. सिमाला यांचे वडील डॉ. भगीरथ प्रसाद देखील आयएएस अधिकारी होते. त्यानंतर ते खासदार झाले. त्यांची आई मेहरुन्निसा परवेझ या सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत.

सिमाला यांचे प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ कोएड स्कूलमध्ये झाले. स्टुडंट्स फॉर एक्सलन्स (IEHE) मधून त्यांनी B.Com आणि बरकतुल्ला विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. परीक्षेत त्या अव्वल आल्याबद्दल त्यांना सुवर्णपदकही मिळाले. यानंतर सिमाला मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या एमपी पीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.

डीएसपी म्हणून पहिली पोस्टिंग

पीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सिमाला प्रसाद यांची पहिली पोस्टिंग डीएसपी म्हणून झाली. या नोकरीदरम्यान त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

सिमाला यांनी आयपीएस होण्यासाठी कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही, स्व-अभ्यासातून त्यांनी UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवले. सिमाला सांगतात की, त्यांना नागरी सेवेत रुजू व्हावंसं वाटेल असं कधीच वाटलं नव्हतं, पण घरच्या वातावरणामुळे त्यांच्या मनात आयपीएस होण्याची इच्छा जागृत झाली.

चित्रपटांमध्ये काम

दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान सिमाला प्रसाद यांचा अत्यंत साधेपणा आणि सौंदर्य पाहून दिग्दर्शक जयघम इमाम यांनी त्यांची भेट घेतली. त्या भेटीत इमाम यांनी सिमाला त्यांच्या ‘अलिफ’ चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितली आणि चित्रपटात भूमिका देऊ केली. ‘अलिफ’ हा सिमाल यांचा ​​पहिला चित्रपट होता आणि तो फेब्रुवारी 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर सिमाला यांनी 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘नक्कश’ चित्रपटातही काम केले.