बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ईशा देओल हिने काही चित्रपटांमध्येही काम केले. मात्र, तिला म्हणावा तसा चित्रपटांमध्ये धमाका करण्यात यश मिळाले नाही. ईशा देओल हिने लग्नाच्या बारा वर्षानंतर भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट घेतला. भरत तख्तानी आणि ईशाच्या घटस्फोटानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. भरत तख्तानी आणि ईशा यांच्या दोन मुली आहेत. भरतसोबतच्या लग्नानंतर मुलींचा सांभाळ ईशा देओल हीच करते. ईशा देओल घटस्फोटानंतर आई हेमा मालिनीच्या घरी शिफ्ट झालीये.
ईशा देओल हिने भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट नेमका का घेतला, याबद्दल काहीच खुलासा हा होऊ शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून ईशा देओल ही आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना सतत दिसत आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
ईशा देओल हिने म्हटले की, पीरियड्समध्ये आम्हाला मंदिरात जाण्यास सक्त मनाई होती. हेच नाही तर पीरियड्स संपल्यानंतर आम्हाला केस धुतल्यानंतर मंदिरात दर्शन घ्यावे लागायचे. हे फक्त पुर्वीपासून चालत आले आहे आणि मी ते फॉलो करते. पुढे ईशा म्हणाली की, या गोष्टी तुमच्या घरात होत असतील तर मी त्याचा सन्मान करते आणि फॉलो करते.
भारतामध्ये आजही अनेक घरांमध्ये या गोष्टींचे पालन केले जाते, असेही ईशा देओल हिने म्हटले आहे. पुढे ईशा म्हणाली की, मला सेक्स एज्युकेशनबद्दल शाळेतच कळाले. माझ्या शाळेत सेक्स एज्युकेशन होते. तिथे आम्हाला योग्य वेळी योग्य गोष्टी सांगितल्या गेल्या. विशेष म्हणजे या गोष्टी सांगणे देखील आवश्यक होते.
घरात पालकांनी कधीच याबद्दल भाष्य केले नाही. आता ईशा देओल हिच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. ईशा देओल ही लवकरच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे ईशा देओल ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही ईशा देओल दिसते.