Actress with Ex Chief Minister Son: वयाच्या 16 व्या वर्षी अभिनेत्री माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या प्रेमात पडते. अनेक वर्ष माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. बॉलिवूडमधील यशस्वी करियर सोडून अभिनेत्रीने माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलासोबत लग्न केलं. अखेर लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघांनी मोठा निर्णय घेतला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगंली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जिनिलिया देशमुख आहे.
जिनिलिया हिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत पार्कर पॅन जाहिरातीत काम केलं होतं. त्यानंतर तीन वेगवेगळ्या भाषांमधील सिनेमे अभिनेत्रीने साईन केले. जिनिलियाचा पहिला बॉलिवूड सिनेमा हीट झाला तेव्हा अभिनेत्री फक्त 16 वर्षांची होती. तेव्हाच जिनिलियाच्या आयुष्यात रितेश देशमुख याची एन्ट्री झाली.
जिनिलिया हिने वयाच्या 16 व्या वर्षी रितेश देशमुख याच्यासोबत ‘तुझे मेरी कसम’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा असल्याने तो खूप अहंकारी असेल असं जेनेलियाला वाटत होतं, पण रितेश देशमुख याच्या अगदी उलट निघाला.
सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं. जवळपास 9 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर मात्र जिनिलिया अभिनयाला रामराम ठोकला. आज रितेश आणि जिनिलिया यांना 2 मुलं आहेत.
लग्नानंतर अभिनेत्रीने तिचा संपूर्ण वेळ कुटुंब आणि मुलांना दिला. 10 वर्षांहून अधिक काळ सिनेमापासून दूर राहिली. जिनिलियाने 10 वर्षांनंतर पती रितेशसोबत पुन्हा सिनेमात एंट्री केली. सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा पुरस्कार समारंभ, दोन्ही स्टार्स नेहमी एकत्र कोणत्याही कार्यक्रमाला जातात. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
रितेश – जिनिलिया यांच्या लग्नाला जवळपास 12 वर्ष झाली आहे. पण तरी देखील दोघांमधील प्रेम कमी झालेलं नाही. रिपोर्टनुसार दोघांनी देखील मोठी निर्णय घेतला आहे. काही काळापूर्वी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला होता. दोघांनीही मृत्यूनंतर आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अवयवदानाबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाला, ‘दुसऱ्याला जीवदान देण्यापेक्षा या जगात कोणतीच चांगली देणगी नाही.’न