Love with Villain | खऱ्या खलनायकांच्या प्रेमात ‘या’ अभिनेत्रींनी ओलांडल्या सर्व मर्यादा, कोण होत्या त्या?

| Updated on: Sep 29, 2023 | 3:35 PM

Love with Villain | बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्री खलनायकांच्या प्रेमात; आता कुठे आहेत बॉलिवूडमधून गायब झालेल्या अभिनेत्री? बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे असतात कायम चर्चेत... प्रेम करणं काही अभिनेत्रींना पडलं महागात?

Love with Villain | खऱ्या खलनायकांच्या प्रेमात या अभिनेत्रींनी ओलांडल्या सर्व मर्यादा, कोण होत्या त्या?
Follow us on

मुंबई : 29 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केलेल्या अभिनेत्री कुठे आहेत काय करतात. कोणाला माहिती नाही. तर, काही अभिनेत्रींचं जीवन खऱ्या आयुष्यातील खलनायकांच्या प्रेमात पडल्यामुळे उद्ध्वस्त झालं. बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचं फार जुनं नातं आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचं नाव अंडरवर्ल्ड डॉनसोबत जोडण्यात आलं. अंडरवर्ल्ड डॉनसोबत नाव जोडलं गेल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडमधून अचानक गायब झाल्या. तर बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेवू ज्यांनी अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात सर्व मर्यादा ओलांडल्या…

अभिनेत्री ममता कुलकर्णी | ममता कुलकर्णी ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने चाहत्यांना घायाळ केलं. करियर यशाच्या शिखरावर असताना ममताचं नाव ड्रग्स माफिया विकी गोसावी याच्यासोबत जोडण्यात आलं. 2017 मध्ये ठाणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. विकी वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, माझा कल अध्यात्माकडे वळला आहे. आता ममता नव्याने आयुष्य जगत आहे.

मोनिका बेदी | जेव्हा मोनिका बेदी यशाच्या उच्च शिखरावर होती, तेव्हा तिचं नाव डॉन अबु सलेम याच्यासोबत जोडण्यात आलं. रिपोर्टनुसार दोघांनी लग्न देखील केलं आणि अभिनेत्रीने स्वतःचा धर्म बदलला. मोनिकाने एका मुलाखतीत अबूसोबतच्या तिच्या नात्याचा खुलासाही केला होता. शिवाय तुरुंगात असताना तिने गीता देखील वाचली. आता देखील मोनिका बेदी हिची चर्चा रंगलेली असते.

मंदाकिनी |  ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमामुळे मंदाकिनी हिच्या लोकप्रियतेत वाढ झाली. पण ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमानंतर अभिनेत्रीला अपयशाचा सामना करावा लागला. बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना अभिनेत्रीचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊतसोबत जोडण्यात आलं. तेव्हा अभिनेत्री तुफान चर्चेत आली. 1996 नंतर ती इंडस्ट्रीतून अचानक गायब झाली. तिने बौद्ध धर्म स्वीकारला आणि विवाहित जीवन जगू लागली. सध्या ती भारतात आहे.

महविश हयात | पाकिस्तानातील अभिनेत्री मेहविश हयात आणि डॉन दाऊद इब्राहिम यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. दाऊतमुळे पाकिस्तानी कलाविश्वात मेहविश हयात हिला सिनेमे मिळतात असं देखील अनेकदा समोर आलं. महविश हयात डॅनपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. शिवाय जेव्हा तिला तमगा-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वात मोठा सन्मान देण्यात आला तेव्हा देखील महविश हयात तुफान चर्चेत आली. त्यानंतर दोघांच्या प्रेमाच्या चर्चा तुफान रंगू लागल्या