बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे नाव आहे. रितेश देशमुख हा बिग बॉस मराठी सीजन 5 ला होस्ट करतोय. विशेष म्हणजे रितेश देशमुखचा अंदाज लोकांना चांगलाच आवडताना देखील दिसतोय. रितेश देशमुख याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. रितेश देशमुख हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. रितेश देशमुख हा सध्या कुटुंबासोबत खास वेळ विदेशात घालवताना दिसतोय. रितेश देशमुख, जेनेलिया आणि त्यांच्या मुलांचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
रितेश देशमुख हा कायमच आपल्या कुटुबियांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतो. जेनेलिया डिसूजा हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये जेनेलिया डिसूजा ही तिच्या आणि रितेशच्या नात्याबद्दल बोलताना थेट दिसलीये. आता जेनेलिया डिसूजा हिच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. पहिल्यांदाच याबद्दल खुलासा करताना जेनेलिया डिसूजा ही दिसली.
जेनेलिया डिसूजा म्हणाली की, मला लवकर झोपण्याची सवय फार अगोदरपासून आहे. रितेशला उशीरा झोपण्याची सवय आहे. एकदा रितेशने रात्री एक वाजता मला एक मेसेज केला आणि म्हटले की, आता आपण एकसोबत राहू शकत नाहीत. त्यावेळी आम्ही दोघे एकमेकांना डेट करत होतो. रितेशचा मेसेज पाहून मला धक्काच बसला.
त्याने मला रात्री एक वाजता तो मेसेज केला आणि झोपी गेला. तो मेसेज मी रात्री अडीच वाजता बघितला. सकाळी नऊपर्यंत माझी अवस्था अत्यंत वाईट झाली. नेमके कुठे चुकले हेच मला कळत नव्हते. त्याने मला नऊ वाजता कॉल केला आणि विचारले की, कसे सुरू आहे झोप वगैरे झाली का?. त्याचे बोलणे ऐकून मला तर अगोदर धक्काच बसला.
तो मला एकदम व्यवस्थित बोलत होता. त्याने मला जो ब्रेकअपचा मेसेज पाठवला तेच तो विसरला होता. मी त्याला त्याबद्दल आठवण करून दिली तर तो मला म्हणाला की, अरे ते तर एप्रिल फुल होते. यानंतर आमचे थोडे वाद झाल्याचे सांगताना देखील जेनेलिया डिसूजा ही दिसली. जेनेलिया डिसूजाने पहिल्यांदाच अशाप्रकारचा खुलासा हा केलाय.