जान्हवी कपूर हिने केले महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत लग्न? ‘ते’ फोटो व्हायरल, शिखर पहाडिया आणि…

| Updated on: Aug 16, 2024 | 3:53 PM

अभिनेत्री जान्हवी कपूर ही सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही तिच्या अभिनयामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत दिसत आहे. अनंत अंबानीच्या लग्नात धमाल करताना जान्हवी कपूर ही दिसली होती. विशेष म्हणजे या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

जान्हवी कपूर हिने केले महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवासोबत लग्न? ते फोटो व्हायरल, शिखर पहाडिया आणि...
Janhvi Kapoor and Shikhar Pahariya
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच आपल्या उलझ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर ही दिसली. मात्र, जान्हवी कपूर हिच्या उलझ चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाहीये. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, जान्हवी कपूरचे हे चित्रपट फ्लॉप जाताना दिसत आहेत. फक्त अभिनयासाठीच नाही तर जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळेही जोरदार चर्चेत आहे.

जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया याला डेट करत आहे. विशेष म्हणजे शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे कायमच एकसोबत स्पॉट होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानीच्या लग्नात शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे खास डान्स करताना देखील दिसले, ज्याचे व्हिडीओ तूफान व्हायरल झाले.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून अशी तूफान चर्चा रंगताना दिसत आहेत की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी लग्न केले आहे. दोघेही जबरदस्त लूकमध्ये दिसत आहेत.

नवीन लग्न झालेले जोडपे एकसोबत जसे दिसते तसेच जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे दिसत आहेत. विशेष म्हणजे नव्या नवरीसारखी साडी आणि मेकअप जान्हवी कपूर हिने केलाय. यामुळेच शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांनी सर्वांच्या गुपचूप लग्न केल्याचे सांगितले जात आहे. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचा लूक सर्वांनाच आवडलाय. मुंबईमध्ये एका कार्यक्रमात दोघे सहभागी झाले होते.

जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत श्रीदेवी यांच्या वाढदिवसानिमित्त तिरूपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळीचे काही खास फोटोही जान्हवी कपूर हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मध्यंतरी एक चर्चा रंगताना दिसली होती की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी साखरपुडा केला असल्याची.