Janhvi Kapoor हिच्या डान्सवर चाहते फिदा, ‘जिया जले’ गाण्यावर अभिनेत्रीचा मनमोहक डान्स

| Updated on: Nov 20, 2023 | 11:37 PM

Janhvi Kapoor : जान्हवी कपूर हिने डान्स रिल्स बनवण्यास केली सुरुवात, 'दिया जले' गाण्यावर डान्स करत अभिनेत्रीने जिंकलं चाहत्यांचं मन... सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल... चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव

Janhvi Kapoor हिच्या डान्सवर चाहते फिदा, जिया जले गाण्यावर अभिनेत्रीचा मनमोहक डान्स
Follow us on

मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर हिने फार कमी कालावधीत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. जान्हवी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. जान्हवी हिने स्वतःच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. फक्त सौंदर्य आणि अभिनय नाही तर जान्हवी उत्तम डान्स देखील करते. सोशल मीडियावर जान्हवी कायम डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने ‘जिया जले’ गाण्यावर डान्स करत चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिच्या डान्सची चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीचा डान्स फक्त चाहत्यांना नाही तर, सेलिब्रिटींना देखील आवडला आहे..

सोशल मीडियावर जान्हवी हिच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. डान्स करताना जान्हवी हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. जान्हवी हिच्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तू प्रचंड छान डान्स करतेस…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जान्हवी कपूर हिच्यामध्ये आई श्रीदेवी यांचे गुण आहेत…’

 

 

व्हिडीओमध्ये जान्हवी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर डान्स करताना दिसत आहे. जान्हवी कपूर हिच्या डान्स व्हिडीओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान, प्रकाश राज, शनाया कपूर यांनी देखील कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे.

जान्हवी कपूर फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. जान्हवी कपूर हिच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून शिखर पहाडिया याच्यासोबत होत आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केलेला नाही.

जान्हवी आणि शिखर यांना अनेकदा बोनी कपूर यांच्यासोबत देखील स्पॉट करण्यात आलं. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये कायम दोघांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते. जान्हवी देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. एवढंच नाही तर, चाहते जान्हवी हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत देखील असतात.