जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. हेच नाही तर जान्हवी कपूर कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतंय. हेच नाही तर यादरम्यान जान्हवी कपूर आपल्या पर्सनल लाईफबद्दलही बोलताना दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. जान्हवी थेट शिखर पहाडियाबद्दलही बोलताना दिसली.
जान्हवी कपूर हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूरने मोठे खुलासे केले आहेत. नेहमीच जान्हवी कपूर खास लूकमध्ये स्पाॅट होताना दिसते. तिच्या कपड्यांची नेहमीच चर्चा होताना दिसते. आता नुकताच याबद्दल बोलताना जान्हवी कपूर दिसली. जान्हवी कपूरचे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे देखील दिसत आहेत.
जान्हवी कपूर म्हणाली की, माझे जवळपास सर्व कपडे आणि दागिने हे भाड्याचे असतात. साडी असो किंवा इतर कोणतेही कपडे सर्वकाही भाड्याचेच असते. मी फार कमी कपडे खरेदी करते. हेच नाही तर मी घातलेले सर्व दागिने देखील भाड्यानेच घेते आणि ते घालून झाले की, परत करते. आता जान्हवी कपूरच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.
हेच नाही तर जान्हवी कपूर पुढे म्हणाली की, मी आज जे शर्ट घातले आहे हे पण भाड्याचेच आहे. आता घरी गेले की, ही परत करायचे आहे. म्हणजेच काय तर जान्हवी कपूर कपडे न खरेदी करता भाड्याचेच कपडे वापरते. जान्हवी कपूर ही नेहमीच खास लूकमध्ये दिसते आणि तिच्या कपड्यांची जोरदार काैतुक केले जाते. आता त्यावरच बोलताना जान्हवी कपूर दिसली.
फक्त जान्हवी कपूर हिच नाही तर जवळपास सर्वच कलाकार असे करत असल्याचे देखील सांगितले जाते. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे कायमच स्पाॅट होताना दिसतात. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसते. हेच नाही तर जान्हवी आणि शिखरने साखरपुडा केल्याचे देखील मध्यंतरी सांगितले जात होते.