गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सतत एका मागून एक चित्रपट जान्हवी कपूर हिचे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, म्हणावा तसा धमाका करण्यात जान्हवी कपूर हिच्या चित्रपटांना यश मिळत नाहीये. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. हेच नाही तर जान्हवी कपूर ही आपल्या चित्रपटाचे प्रमोशनही सोशल मीडियावरून करते. जान्हवी कपूर अनंत अंबानीच्या लग्नात धमाल करताना दिसली.
जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. मध्यंतरी जान्हवी कपूर हिचे काही फोटो व्हायरल झाले. या फोटोनंतर एक चर्चा रंगताना दिसली की, जान्हवी कपूर हिने शिखर पहाडिया याच्यासोबत लग्न केले. जान्हवी कपूर डेट करत असलेला शिखर पहाडिया हा सुशीलकुमार शिंदे यांच्या मुलीचा मुलगा आहे.
जान्हवी कपूर ही नेहमीच आपल्या फिटनेसकडे लक्ष देते. विशेष म्हणजे ती जिममध्ये व्यायाम करण्यासोबतच हेल्दी गोष्टी खाण्यावर अधिक भर देते. आता नुकताच जान्हवी कपूर हिने तिच्या डाएडबद्दल मोठा खुलासा केलाय. जान्हवी कपूर ही सकाळची सुरूवात कोमट पाणी, लिंबू आणि मधाने करते. त्यानंतर एक चमचा तूप देखील जान्हवी कपूर खाते.
कोमट पाण्यात लिंबू आणि मध्य मिक्स करून पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तूप त्वचेसाठी फायदेशीर असल्याने ती न विसरता एक चमचा तूप खाते. त्यानंतर घरातील साधे जेवण खाण्यावर जान्हवी कपूरचा अधिक भर असतो. चपाती, भाजी, दाल आणि खूप सारे सलाड जान्हवी कपूर आपल्या जेवणात घेते.
यासोबतच प्रोटीन अधिक घेण्यासाठी पनीर आणि चिकनही अधिक खाण्यावर जान्हवी कपूरचा भर असतो. यासोबतच जान्हवी कपूर ही न चुकता दररोज व्यायाम करते. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच उलझ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, जान्हवी कपूर हिच्या या चित्रपटाला धमाका करण्यास यश मिळाले नाहीये. उलझ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही जान्हवी कपूर ही दिसली.