Video | जान्हवी कपूर हिचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीचा साडीमध्ये जलवा

| Updated on: Oct 22, 2023 | 5:38 PM

जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. जान्हवी कपूर ही आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे.

Video | जान्हवी कपूर हिचा तो व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीचा साडीमध्ये जलवा
Follow us on

मुंबई : जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. जान्हवी कपूर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर दिसली. मात्र, या चित्रपटाला काहीच धमाका करण्यात यश मिळाले नाही.

जान्हवी कपूर हिच्या मिली या चित्रपटाची निर्मिती तिचेच वडील बोनी कपूर यांनी केली. मिली चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा असतानाच चित्रपट फ्लाॅप गेला. जान्हवी कपूर ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. मात्र, तिने आपल्या नात्यावर कधीच भाष्य केले नाहीये.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे कायमच एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. इतकेच नाही तर हे पार्ट्यांमध्येही एकसोबत जातात. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. इतकेच नाही तर गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये धमाकेदार डान्स करताना जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे दिसले.

सध्या जान्हवी कपूर हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. जान्हवी कपूर या व्हिडीओमध्ये जबरदस्त लूकमध्ये दिसतंय. जान्हवी कपूर हिच्या या लूकवर चाहते हे फिदा झाल्याचे बघायला मिळतंय. जान्हवी कपूर हिने या व्हिडीओमध्ये जांभळ्या रंगाची खास साडी घातल्याचे दिसतंय.

जान्हवी कपूर हिने पापाराझी यांच्याकडे पाहून फोटोसाठी काही पोझ दिल्याचे देखील दिसतंय. या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर हिचा जबरदस्त लूक दिसत आहे. जान्हवी कपूर हिच्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. आता हाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.