जान्हवी कपूर हिच्यासोबत हैराण करणारा प्रकार, थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आला मदतीला धावून

| Updated on: Jul 06, 2024 | 6:24 PM

बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. नेहमीच सोशल मीडियावर जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. जान्हवी कपूर ही शिखरसोबत लग्न करणार असल्याचेही सांगितले जाते.

जान्हवी कपूर हिच्यासोबत हैराण करणारा प्रकार, थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आला मदतीला धावून
Janhvi Kapoor
Follow us on

जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. जान्हवी कपूर आणि शिखर कायमच एकसोबत स्पॉट होताना देखील दिसतात. जान्हवी कपूर ही लवकरच शिखर पहाडिया याच्यासोबत लग्न करणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच हे तिरूपती बालाजी मंदिरात देखील जोडीने गेले होते. मध्यंतरी तरी तर हीच एक चर्चा रंगताना दिसली की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी सर्वांच्या गुपचूप साखरपुडा देखील केला आहे. मात्र, त्यावर खुलासा होऊ शकला नाही.

आता जान्हवी कपूर ही नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट याच्या संगीत सेरेमनीमध्ये शिखर पहाडिया याच्यासोबत पोहोचली होती. यावेळी खास डान्स करताना देखील जान्हवी कपूर दिसली. याचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. जान्हवी कपूर ही जबरदस्त लूकमध्ये अंबानींच्या पार्टीत सहभागी झाली होती.

हेच नाहीतर अत्यंत खास कपड्यांमध्ये जान्हवी कपूर ही पोहोचली. मात्र, यावेळी जान्हवी कपूर हिच्यासोबत एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडला. भर पार्टीमध्ये जान्हवी कपूर हिचा ड्रेस फाटला. त्यानंतर शिखर पहाडिया हा जान्हवी कपूर हिच्या मदतीला धावून आला. हा ड्रेस अत्यंत खास असा दिसत आहे. 

जान्हवी कपूर हिचा ड्रेस शिखर पहाडिया याने डान्सच्या अगोदर कट केल्याचे बघायला मिळतंय. तो ड्रेस अगोदर फाटल्याने शिखर पहाडिया याने असे केल्याचे सांगितले जातंय. एक फोटो तूफान व्हायरल होतोय. या फोटोमध्ये जान्हवी कपूर ही त्रस्त होऊन बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूप जास्त त्रासात दिसत आहे. दुसरीकडे शिखर पहाडिया हा तिचा ड्रेस कट करत असल्याचे फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.

आता हाच फोटो व्हायरल होतोय. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मध्यंतरी चर्चा होती की, शिखर आणि जान्हवीचे ब्रेकअप झाले. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू असून अत्यंत मोठ्या संपत्तीचा तो मालक आहे. शिखर पहाडिया याच्या लहान भावाला सारा अली खान ही डेट करत असल्याची मध्यंतरी चर्चा होती.