मुंबई : जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. विषय कोणत्याही असो जया बच्चन आपले मत मांडताना फार काही विचार करत नाहीत. जया बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अभिनयासोबतच जया बच्चन या राजकारणात देखील चांगल्याच सक्रिय दिसत आहेत. जया बच्चन यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या व्हिडीओमध्ये त्या पापाराझी यांनी खडेबोल सुनावताना अनेकदा दिसल्या आहेत. जया बच्चन रोखठोक बोलताना दिसतात.
नुकताच आता जया बच्चन या नात नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये पोहचल्या. यावेळी अनेक विषयांवर जया बच्चन यांनी भाष्य केले. नव्या हिचा हा शो चांगलाच चर्चेत दिसतोय. नव्या हिचा भाऊ अगस्त्य नंदा हा या शोमध्ये पोहचला होता. यावेळी अगस्त्य हा थेट डिप्रेशनबद्दल बोलताना दिसला आणि त्याने आपण किती जास्त वाईट काळातून गेल्याचे देखील सांगितले.
आता नुकताच शोमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा या ट्रोलिंगबद्दल बोलताना दिसल्या. यावेळी नव्या नवेली नंदा ही म्हणाली की, नेगेटिव्ह गोष्टींवर व्यूज आणि कमेंट्स जास्त येतात. यावर जया बच्चन या थेट म्हणाल्या की, तुम्हाला कमेंट करायच्या असतील तर सकारात्मक करा. यावर नव्या म्हणते की, या लोकांना समोर बसवले तर हे काही बोलू शकणार नाहीत.
हे ऐकताच जया बच्चन या म्हणाल्या की, तुमच्यामध्ये काही सांगायची हिंमत असेल तर खऱ्या गोष्टींवर कमेंट करा आणि तुमचा चेहरा देखील दाखवा. यावर श्वेता बच्चन ही म्हणाली की, आजकाल लोकांना दुसऱ्यांच्या दु:खात आनंद होतो. शोमध्ये अजून काही विषयांवर चर्चा करताना जया बच्चन, श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा हे दिसले.
नव्या नवेली नंदा हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना नव्या दिसली. यावेळी नव्या हिला विचारण्यात आले की, तुझ्या शोमध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे सहभागी होणार का? यावर नव्या हिने म्हटले की, तो खूप जास्त मोठा दिवस असेल. लवकरच नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये अभिषेक बच्चन आणि अभिताभ बच्चन हे एकत्र पोहचू शकतात.