ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे सध्या बच्चन कुटुंबिय चांगलेच चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. घटस्फोटाची चर्चा असताना त्यावर एकदाही भाष्य बच्चन कुटुंबातील कोणत्याच सदस्याने केले नाहीये. जया बच्चन या नेहमीच त्यांच्या स्पष्ट स्वभावासाठी ओळखल्या जातात. मात्र, जया बच्चन यांनीही ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर भाष्य करणे टाळले आहे. बच्चन कुटुंबियांंमध्ये वाद सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. घटस्फोटाच्या चर्चांमध्येच सध्या जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. जया बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये मोठा काळ गाजवला आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात खास लूकमध्ये मुलगी श्वेता, अमिताभ बच्चन आणि नव्या नवेली नंदासोबत त्या दाखल झाल्या होत्या. जया बच्चन यांचा राज्यसभेतील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी मस्त मूडमध्ये जया बच्चन दिसल्या. जया बच्चन यांनी असे काही म्हटले की, जया बच्चन यांचे बोलणे ऐकून सर्वजण हसण्यास सुरूवात करतात.
ज्या गोष्टीचा मुद्दा जया बच्चन यांनी उपस्थित केला होता, ज्या गोष्टीला त्यांचा विरोध होता तीच गोष्ट बोलताना जया बच्चन या दिसल्या. काही दिवसांपूर्वीच हरिवंश नारायण सिंह यांनी जया अमिताभ बच्चन या नावाने त्यांना संबोधित केले होते. ही गोष्ट जया बच्चन यांना अजिबातच आवडली नव्हती. त्यांनी संताप करत थेट म्हटले होते की, महिलांची एक वेगळी ओळख असते. फक्त त्यांना पतीच्या नावाने ओळखणे चुकीचे आहे.
Don’t miss this video!
VP Dhankar handled Jaya Bachchan like a Pro 😂 pic.twitter.com/lcUMUhLnit
— BALA (@erbmjha) August 2, 2024
आता राज्यसभेत जगदीप धनखड यांच्यासोबत बोलताना जया बच्चन यांनी थेट म्हटले की, मी जया अमिताभ बच्चन…जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून सर्वजण हसतात. हेच नाही तर जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून जगदीप धनखड हे देखील स्वत:ला हसण्यापासून रोखू शकले नाहीत. जगदीप धनखड यांच्यासोबत मजाक करताना जया बच्चन दिसल्या.
जया बच्चन या म्हणाल्या की, तुमचे जेवण पचत नाही, यासाठी तुम्ही परत परत जयरामजी यांचे नाव घेत आहात. आता जया बच्चन यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय, जया बच्चन या नेहमीच रागात दिसतात. परंतू राज्यसभेत त्या वेगळ्याच मूडमध्ये दिसल्या. लोकांना जया बच्चन यांचा हा अंदाज चांगलाच आवडताना दिसतोय.