विमान क्रॅश झालाय… काजोलच्या मृत्यूची चर्चा, सर्वत्र खळबळ

| Updated on: Oct 27, 2024 | 12:23 PM

Bollywood Actress Kajol: विमान क्रॅश झाल्यामुळे अभिनेत्री काजोल हिचं निधन...? अभिनेत्रीच्या मृत्यूच्या चर्चांमुळे सर्वत्र खळबळ... काजोल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

विमान क्रॅश झालाय...  काजोलच्या मृत्यूची चर्चा, सर्वत्र खळबळ
Follow us on

Bollywood Actress Kajol: अभिनेत्री काजोल, कृती सनॉन आणि अभिनेता शहीर शेख स्टारर ‘दो पत्ती’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शितझाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याच दरम्यान सिनेमाची पूर्ण कास्ट विनोदवीर कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये पोहचली. या खास वेळी कपिलने संपूर्ण स्टारकास्टचं ग्रँड वेलकम केलं. याच दरम्यान काजोल हिने स्वतःच्या निधनाच्या पसरलेल्या अफवांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. काजोलने सत्य सांगितल्यानंतर शोची जज अर्चना पुरन सिंह आणि कपिल देखील हैराण झाले.

शोदरम्यान कपिल शर्माने काजोल, क्रिती सेनॉन आणि शाहीर शेख यांना विचारले की तुम्ही सर्वांनी कधी स्वतःबद्दल विचित्र बातम्या वाचल्या ऐकल्या आहेत का? यावर काजोल म्हणाली, ‘अशा विचित्र बातम्यांबद्दल गुगल देखली करयाची गरज भासत नाही. कारण काहीही झालं तरी लगेच फोन येतात.’
पुढे कपिल विचारतो, कोणती बातमी तुला अधिक विचित्र वाटली? यावर काजोल म्हणाली, ‘दर 5 ते 10 वर्षांनी अफवा रंगते की माझं निधन झालं आहे.

 

 

असं अनेकदा झालं आहे. सोशल मीडियाच्या आधी देखील असं अनेकदा झालं आहे. मझ्या लक्षात आहे, कोणी तरी माझ्या आईला माझं विमान क्रॅश झाल्याची माहिती दिली होता. तेव्हा फोन आणि सोशल मीडिया असं काहीही नव्हतं… तेव्हा माझी आई माझी वाट पाहात बसली होती.’

पुढे काजोल म्हणाली, ‘सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये माझ्या मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं… ती माझ्यासाठी सर्वात विचित्र बातमी होती.’ यावर कपिल म्हणतो, खरंच हे प्रचंड वाईट आहे. कृती देखील म्हणते, ‘प्रचंड वाईट बातम्या आहेत. असं नाही व्हायला पाहिजे…’

सांगायचं झालं तर, फक्त काजोल हिच्यासोबत नाही तर, अनेक सेलिब्रिटींसोबत असं झालं आहे. नुकताच, बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्या निधनाची अफवा व्हायरल झाली होती. यानंतर त्यांच्या केअरटेकरने जया बच्चन यांच्या आई जिवंत असल्याची माहिती दिली.