मुंबई | 26 जुलै 2023 : झगमगत्या विश्वात काही अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे अभिनेत्रींना वाईट प्रसंगांचा सामना करावा लागतो… इंडस्ट्रीमध्ये कास्ट्रींग काऊचबद्दल तर अनेक अभिनेत्रींनी खुलासे केले. पण इंडस्ट्रीमध्ये वर्णद्वेषाची शिकार झालेल्या कल्की कोचलिन हिची व्यथा थक्क करणारी आहे. कल्की जवळपास १ दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत अभिनेत्रीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, पण बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी अभिनेत्रीला अनेक गोष्टींचा सामना कराला लागला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामुळे अभिनेत्रीच्या आयुष्यातील एक मोठी गोष्ट अनेक वर्षांनंतर समोर आली आहे..
गोऱ्या रंगामुळे कल्की हिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं. अभिनेत्री म्हणाली, ‘लहान असल्यापासून माझ्या गोऱ्या रंगामुळे मला ट्रोल करण्यात आलं आहे. मी गोरी असल्यामुळे मला कायम विचारलं जायचं तू ड्रग्स घेतेस का? शिवाय गोऱ्या मुलींना कॅरेक्टर लेस असतात असा देखील माझ्या ग्रुपचा समज होता…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘पण जेव्हा मी त्यांना तामिळमध्ये उत्तर द्यायची तेव्हा माझ्या ग्रुपमधील लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. हा बदल एकाच कारणामुळे होतो, कारण तुम्ही त्यांच्या भाषेत बोलता…’ कल्की हिचा जन्म पांडिचेरी याठिकाणी झाला आहे. त्यानंतर अभिनेत्री ऊंटी याठिकाणी शिफ्ट झाली..
एवढंच नाही तर नुकताच झालेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीने कास्टिंग काऊचबद्दल देखील मोठा खुलासा केला. कोणाचंही नाव न घेता अभिनेत्री मोठा खुलासा केला. एका निर्मात्याने अभिनेत्रीला मुख्य भूमिका देण्याचं वचन दिलं होतं. निर्मात्याने अभिनेत्रीला जेवणासाठी बोलावलं, पण अभिनेत्रीने निर्मात्याचा प्रस्ताव मान्य केला नाही.
कल्कीने असेही सांगितले की असे अनेक प्रसंग आले होते जेव्हा तिला तिच्या लूकसाठी समस्यांना सामोरे जावे लागलं होतं. अभिनेत्रीला तिच्या दातांसाठी देखील टीकेचा सामना करावा लागला, कारण लोक म्हणाले की ते ‘खूप मोठे’ दिसत होते. सध्या कल्की तिने केलेल्या धक्कादायक वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.
कल्की हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच झोया अख्तर आण रीमा कागती यांच्या वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्रीच्या आगामी सीरिजचं नाव ‘मेड इन हेव्हन २’ मध्ये दिसणार असून सीरिज प्राईम व्हिडीओ इंडिया या ओटीटी प्लॅटफॉर्म दिसणार आहे.
‘मेड इन हेव्हन २’मध्ये कल्की हिच्यासोबतच शोभिता धूलिपाला, अर्जुन माथुर, जिम सर्भ, शशांक अरोरा आणि शिवानी रघुवंयशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र कल्की हिच्या ‘मेड इन हेव्हन २’ सीरिजची चर्चा रंगलेली आहे.