मुंबई : बॉलिवूडची क्विन कंगना रनौत (kangana ranaut) विविध विषयांवर आपली मतं मांडत असते. तिने मांडलेली मतं, तिची विधान चर्चेचा विषय बनतात. आताही तिने असं एक विधान केलं आहे जे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने थेट कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (caneda prime minister justin trudeau) यांच्यावर टीका केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरी ठेवत जस्टिन ट्रूडो यांच्यावर निशाणा साधला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलंय, ‘तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावी लागतील.’ कॅनडा-अमेरिका सिमेवर ट्रक ड्रायव्हरने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिने जस्टिन ट्रूडो यांना लक्ष केलं आहे. तिने इस्टाग्रामवर आपलं मत मांडल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कंगनाचा जस्टिन ट्रूडो यांच्यावर निशाणा
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरी ठेवत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर निशाणा साधला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलंय, ‘तुम्हाला चुमच्या कर्माची फळं भोगावी लागतील.’ कॅनडा-अमेरिका सिमेवर ट्रक ड्रायव्हरने केकेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिने जस्टिन ट्रूडो यांना लक्ष केलं आहे. तिने इस्टाग्रामवर आपलं मत मांडल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कॅनडा-अमेरिका सिमेवर ट्रक ड्रायव्हर आंदोलन
कॅनडा सरकारने ‘कॅनडात येणाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं असावं’, अशी घातली. त्याचाविरोध करण्यासाठी कॅनडा-अमेरिका सिमेवर शेकडो ट्रक ड्रायव्हरनी आंदोलन पुकारलं. या आंदोलकांनी या नियमांना कॅनडा सरकारचा फॅसिझम म्हटलं आहे. याच आंदोलनाचा धागा पकडत कंगनाने ट्रूडो यांच्यावर निशाणा साधला. तिच्या या विधानाला भारतातील शेतकरी आंदोलनावर ट्रूडो यांनी व्यक्त केलेल्या मताची किनार असल्याचं बोललं जातंय.
भारतातील शेतकरी आंदोलनावर ट्रूडो यांचं समर्थन
राजधानी दिल्लीच्या सीमेवर झालेलं शेतकरी आंदोलन जगभर चर्चेत राहिलं. त्यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही या आंदोलनावर त्यावेळी आपलं मत मांडलं होतं. त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. ‘भारतात चाललेलं आंदोलन चिंताजनक आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांच्या कुटुंबाला घेऊन चिंतीत आहे. शांतीपूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्यांच्या रक्षणासाठी कॅनडा कायम उभा राहिलं’, असं ट्रूडो म्हणाले होते. त्यावरही त्यावेळी कंगना बोलती झाली होती.
संबंधित बातम्या