अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. बॉलिवूडसोबतच कंगना राणावत हिने आता आपला मोर्चा हा चक्क राजकारणाकडे वळवला आहे. लोकसभेची निवडणूक लढवून कंगना खासदार झालीये. राजकारण सांभाळतच आता कंगना राणावत ही तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. कंगना ही आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बॉस मराठी सीजन 5 च्या मंचावर देखील पोहोचली होती. इमर्जन्सी चित्रपटाचे सध्या प्रमोशन करताना कंगना दिसत आहे.
इमर्जन्सी चित्रपटाकडून कंगना राणावत हिला मोठ्या अपेक्षा आहेत. कंगना राणावत ही नुकताच बॉलिवूडवर निशाना साधताना दिसलीये. कंगना राणावत हिच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या समस्या आता चांगल्याच वाढताना दिसत आहेत. कंगनाच्या चित्रपटाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. काही आरोप चित्रपटावर करण्यात आले आहेत.
शीख समुदायाकडून इमर्जन्सी चित्रपटावर आक्षेप घेण्यात आलाय. भावना दुखावल्याचा आरोप आहे. शीख समुदायाने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पंबाजमध्ये चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच आता तेलंगणातही चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जातंय. यामुळे आता हा वाद वाढण्याची दाट शक्यता देखील आहे.
रिपोर्टनुसार, भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी तेजदीप कौर मेनन यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा शीख सोसायटीच्या शिष्टमंडळाने सरकारी सल्लागार मोहम्मद अली शब्बीर यांची भेट घेतली. यावेळी शीख संघटनेने इमर्जन्सीच्या स्क्रीनिंगवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता तेलंगणात चित्रपट रिलीज होणार की, नाही हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
एकीकडे चित्रपटाला विरोध वाढत असतानाच कंगना जोरदार प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीमध्ये कंगना राणावत हिने म्हटले होते की, मी खान, कपूर आणि कुमारचे चित्रपट करत नाही. माझ्या इमर्जन्सी चित्रपटाला जर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर हे लोक तोंड दाखवण्यासही राहणार नाहीत. कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनाबद्दल एक धक्कादायक विधान केले होते.