बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. करीना कपूर हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. सोशल मीडियावर करीना कपूरची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. करीनाचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. करीनासोबत या चित्रपटात आमिर खान हा देखील मुख्य भूमिकेत दिसला. मात्र, त्या चित्रपटाला धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. दुसरीकडे सैफ अली खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सैफ कायमच चर्चेत असणारे नाव आहे.
सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सैफ अली खानचे करीनासोबतचे दुसरे लग्न तर करीनाचे पहिलेच लग्न होते. अनेक वर्ष त्यांनी आपले रिलेशन सर्वांपासून लपून ठेवले. आता करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला अनेक वर्ष पूर्ण झाली आहेत.
करीना कपूर ही सोशल मीडियावर कायमच आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच करीनाने तिच्या एका फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. आता करीना कपूर आणि सैफ अली खान हे आपल्या कुटुंबासोबत विदेशात फिरण्यासाठी निघाले आहेत. यावेळी सर्वचजण जबरदस्त लूकमध्ये दिसत होते.
करीना कपूर, सैफ अली खान, तैमूर अली आणि जेह अली खान हे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी पापाराझीकडे पाहून फोटोसाठी पोझ देताना सैफ अली खान हा दिसला. करीनाचा एकदम क्लासी लूक दिसला. शूटिंगमधून वेळ मिळाला की, करीना आणि सैफ अली खान हे विदेशात जाताना कायमच दिसतात.
करीना कपूर आणि सैफ अली खान आपल्या मुलांसोबत काही दिवसांपूर्वीच आफ्रिकेत खास वेळ घालवताना दिसले. ज्याचे फोटो करीना कपूर हिने सोशल मीडियावर शेअर केले होते. करीना कपूर हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा करत म्हटले होते की, तिनेच सैफला त्याच्या हातावर दोघांच्या नावाचा टॅटू काढण्यास सांगितले होते.