मुंबई : गेल्या काही दिवसांपासून झगमगत्या विश्वात चर्चेत असलेला विषय म्हणजे मॉडेल उर्फी जावेद हिचा फॅशन सेन्स. उर्फी कायम तिच्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फीला तिच्या तोकड्या कपड्यांमुळे टीकेचा देखील सामना करावा लागला. पण तरी देखील उर्फी आजही तिच्या फॅशनमुळे तुफान चर्चेत असते. मुलाखतीत अनेक सेलिब्रिटींनी उर्फीच्या फॅशनबद्दल विचारलं जातं. यावर सेलिब्रिटी स्वतःची स्पष्ट भूमिका देखील मांडतात. आता अभिनेत्री करीना कपूर खान हिने देखील एका मुलाखतीत उर्फी जावेद हिचे कपडे आणि फॅशनवर मोठं वक्तव्य केलं आहे. आज उर्फीमुळे करीना कपूर तुफान चर्चेत आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत करीना कपूर म्हणाली, ‘उर्फी इतकं धाडस माझ्यात नाही. ती मुलगी खरंच खूर धाडसी आहे. ती तिच्या इच्छेनुसार कपडे घालते. लोकांना देखील उर्फीला बघायला आवडतं. फॅशनमुळे स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्य मिळतं. उर्फीमध्ये फार आत्मविश्वास आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘उर्फी प्रत्येक लूकमध्ये कूल दिसते. उर्फी तिला हवे तसे कपडे घालते.. याचच नाव फॅशन आहे. तुम्हाला जे चांगलं वाटतं ते करा… फक्त पूर्ण आत्मविश्वास असला पाहिजे… मी उर्फीच्या आत्मविश्वासाचं कौतुक करते…’ असं देखील करीना कपूर, उर्फीबद्दल म्हणली.
Urfi Javed
उर्फीच्या फॅशनचं कौतुक फक्त करीना कपूर हिने नाही तर, याआधी देखील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी केलं आहे. अभिनेता रणवीर सिंग, रॅपर हनी सिंग यांनी देखील उर्फीच्या फॅशनचं कौतुक केलं आहे.
उर्फी जावेदच्या स्टाईलला अभिनेता रणबीर कपूरचा विरोध
What Women Want या चॅट शोमध्ये करीनाने रणबीरला उर्फीचा फोटो दाखवला आणि विचारलं ही कोण आहे? यावर रणबीर म्हणाला, ‘ही उर्फी आहे का?’ अभिनेता पुढे म्हणाला, ‘अशा प्रकारची फॅशन मला बिलकूल आवडत नाही..’ आणि उर्फीच्या फॅशनचा रणबीर याने बॅड टेस्ट म्हणून उल्लेख केला होता.
मॉडेल उर्फी जावेद हिच्या फोटो आणि व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. अनेकांनी उर्फीच्या फॅशनचा विरोध केला तर, अनेकांनी तिचं समर्थन केलं. अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री कंगना रनौत आणि मसाबा गुप्ता यांनी देखील उर्फीच्या कपड्यांवर वक्तव्य केलं. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये रणवीर सिंह यांनी उर्फीच्या कपड्यांचा उल्लेख फॅशन आयकॉन म्हणून केला.