करिश्मा कपूर हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मात्र, करिश्मा कपूर ही तिच्या पर्सनल लाईफमुळे तूफान चर्चेत दिसली. करिश्मा कपूर हिने पती संजय कपूर याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. करिश्मा कपूरने केलेल्या आरोपांनंतर तूफान चर्चा रंगताना दिसल्या. लग्नाला 13 वर्षे पूर्ण झाल्यानंतर करिश्मा कपूर हिने संजय कपूर याच्यासोबत अखेर घटस्फोट घेतला. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे एक मुलगा आणि मुलगी आहेत. सध्या मुलांचा पूर्ण सांभाळ करिश्मा कपूर हिच करते. करिश्मा कपूरच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा करण्यात आला.
करिश्मा कपूर हिचे लग्न ठरले होते. त्यावेळी असे काही झाले की, करिश्मा कपूर हिने संजय कपूर याच्यासोबत लग्न नाही करायचे हे पूर्णपणे ठरवले होते. मात्र, त्यानंतर संजय कपूर आणि त्याच्या कुटुंबियांनी परत लग्नासाठी करिश्मा कपूरवर दबाव आणला. करिश्मा कपूर हिने संजय कपूरच्या वडिलांमुळेच लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न होण्याच्या अगोदर संजय कपूरच्या वडिलांनी करिश्माच्या आईला एका गोष्टीवरून रडवले होते. ज्यानंतर करिश्मा कपूर हादरली होती. यानंतर थेट संजय कपूर याच्यासोबत लग्न न करण्याचा निर्णय करिश्मा कपूरने घेतला होता. मात्र, त्यानंतर संजय आणि त्याच्या कुटुंबियांनी तिला काही गोष्टी समजावल्या.
आता याबद्दल खुलासा करण्यात आलाय. मुळात म्हणजे संजय कपूर याच्याकडून करिश्मा कपूरला अनेकदा मारहाण करण्यात आली. हेच नाही तर ज्यावेळी ती प्रेग्नंट होती, त्यावेळी देखील तिला मारहाण करण्यात आली. ज्यावेळी लग्न झाल्यानंतर करिश्मा कपूर ही संजय कपूरसोबत फिरायला गेली होती, त्यावेळी करिश्मा कपूरची बोली त्याने लावल्याचाही आरोप करिश्माकडून करण्यात आला.
संजय कपूर याच्यासाठी करिश्मा कपूरसोबत घटस्फोट घेणे नक्कीच सोपे नव्हते. पोटगीमध्ये बक्कळ पैसे करिश्मा कपूरला देण्याची वेळ संजय कपूर याच्यावर आली. करिश्मा कपूरसोबतच्या घटस्फोटानंतर संजय कपूरने दुसरे लग्न केले. मात्र, अजूनही करिश्मा कपूर हिने लग्न केले नाहीये किंवा ती कोणाला डेट करते, त्याबद्दलही काही खुलासा कधी होऊ शकला नाही. आपल्या मुलांसोबत करिश्मा कपूर ही मुंबईत राहते.