अभिनेत्री कतरिना कैफ हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही कतरिना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. कतरिना हिने 9 डिसेंबर 2021 मध्ये अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्न केलं. आज अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. दरम्यान, कतरिना हिने 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत लग्न आणि करियर संबंधी मोठं वक्तव्य केलं होतं.
मुलाखतीत कतरिना कैफ हिला करियर नाही तर, लग्नाला अधिक महत्त्व देशील का? असा प्रश्न विचारला होता. यावर कतरिना म्हणाली, ‘जर मला असं करायचं असेल तर मी नक्की करेल… कोणीच माझ्यावर दबाव टाकू शकत नाही. जर माझी इच्छा घरी राहाण्याची असेल तर मी घरी राहील… मला असं वाटलं की घरी राहून मुलांचा सांभाळ करायला हवा… तर मी मुलांचा सांभाळ देखील करेल…’
‘मला असं वाटतं प्रत्येक महिलेने तिला काय वाटतं, तिला काय हवं आहे… याबद्दल जाणून घेतलं पाहिजे.’ असं देखील कतरिना म्हणाली होती. कतरिना कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. करियर सुरुवातीला कतरिना हिचं नाव अभिनेता सलमान खान याच्यासोबत जोडण्यात आलं.
सलमान खान याच्यासोबत कतरिना हिने अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. ‘टायगर’ सिनेमातील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण सलमान – कतरिना यांनी कधीच नात्यावर अधिकृत घोषणा केली नाही.
सलमान खान याच्यानंतर कतरिना हिच्या आयुष्यात अभिनेता रणबीर कपूर याची एन्ट्री झाली. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रणबीर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना प्रचंड दुःखी असल्याची माहिती देखील समोर आली.
पण जेव्हा कतरिना हिने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. कारण कतरिना – विकी यांनी डेटिंगबद्दल मौन साधलं होतं. कतरिना – विकी यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत मोठ्या शाही थाटात लग्न केलं. कतरिना – विकी यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.