मुंबई : कतरिना कैफ हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कतरिना कैफ हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. नुकताच कतरिना कैफ हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक कतरिना कैफ हिचे काैतुक करताना दिसत आहेत. नुकताच विकी काैशल याच्या सॅम बहादूर या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग पार पडले. यावेळी विकी काैशल याला सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण कुटुंब पोहचल्याचे बघायला मिळतंय. विकी काैशल याचा सॅम बहादूर हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ बघायला मिळतंय.
कतरिना कैफ ही देखील सॅम बहादूर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला पोहचली. यावेळी कतरिना कैफ हिचा लूक जबरदस्त दिसला. कतरिना कैफ हिच्यासोबत यावेळी विकी काैशल याची आई दिसली. इतकेच नाही तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये गर्दीमध्ये सासूबाईचे संरक्षण करताना कतरिना कैफ ही दिसत आहे. सासूची काळजी कतरिना कैफ घेत आहे.
आता कतरिना कैफ हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. कतरिना कैफ हिचा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचे काैतुक केले. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, विदेशात राहिली आहे. मात्र, खरोखरच या कतरिना कैफ हिचे संस्कार खूप जास्त चांगले नक्कीच दिसत आहेत.
दुसऱ्याने लिहिले की, फक्त कॅमेऱ्यासमोर दिखावा आहे की, रिअलमध्ये ही अशी आहे. तिसऱ्याने लिहिले की, खरोखरच एक चांगली सून कतरिना कैफ ही आहे. कतरिना कैफ हिच्या या व्हिडीओवर सतत चाहते हे कमेंट करताना दिसत आहेत. कतरिना कैफ हिचा देखील दिवाळीच्या दिवशी टायगर 3 हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला.
टायगर 3 चित्रपटात कतरिना कैफ हिच्यासोबत सलमान खान हा मुख्य भूमिकेत दिसला. टायगर 3 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी दिसली. टायगर 3 चित्रपटाने ओपनिंगही जबरदस्त केली. मात्र, दोन चार दिवसांमध्येच चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. म्हणावा तसा धमाका करण्यात चित्रपटाला यश मिळाले नाही.