Kiara Advani | थेट कियारा अडवाणी हिने जाहीर केली गर्भवती होण्याची इच्छा, मोठे कारण सांगत अभिनेत्रीने केला खुलासा

| Updated on: Jul 28, 2023 | 5:50 PM

बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच कियारा अडवाणी हिचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे सत्यप्रेम की कथा हा चित्रपट धमाका करताना दिसला. परत एकदा कार्तिक आणि कियाराची जोडी हिट ठरली.

Kiara Advani | थेट कियारा अडवाणी हिने जाहीर केली गर्भवती होण्याची इच्छा, मोठे कारण सांगत अभिनेत्रीने केला खुलासा
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि कार्तिक आर्यन यांचा काही दिवसांपूर्वीच सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे पुन्हा एकदा बाॅक्स आॅफिसवर कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी हिट ठरलीये. या जोडीने धमाका केला आहे. विशेष म्हणजे कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन (Karthik Aryan यांचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट हिट ठरला. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी सत्यप्रेम की कथा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. या चित्रपटानंतर (Movie) लगेचच कार्तिक आर्यन याने त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग हे विदेशात सुरू केले आहे.

दुसरीकडे कियारा अडवाणी ही सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे सक्सेस कुटुंबियांसोबत साजरे करताना दिसत आहे. सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाल्यापासून आपल्या कुटुंबियांना खास वेळ देताना कियारा अडवाणी ही दिसत आहे. नुकताच आता कियारा अडवाणी ही पती सिद्धार्थ याच्यासोबत विदेशात गेली.

गेल्या काही दिवसांपासून सतत कियारा अडवाणी हिला गुड न्यूज कधी देणार हे विचारले जात आहे. शेवटी यावर नुकताच भाष्य करताना कियारा अडवाणी ही दिसली आहे. कियारा अडवाणी म्हणाली की, मला प्रेग्नेंट होण्याची खूप जास्त इच्छा आहे. त्याचे कारणही तेवढेच मोठे आणि खास आहे. कियारा अडवाणी यावेळी स्पष्ट बोलताना दिसली.

कियारा अडवाणी पुढे म्हणाली, मला प्रेग्नेंट फक्त आणि फक्त यासाठी व्हायचे आहे. कारण या काळात आपल्याला आवडेल ते खाता येते आणि कुठेही फिरता येते. कियारा अडवाणी हिचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. मुळात म्हणजे कियारा अडवाणी हिच्या आगामी चित्रपटाचे नाव हे गुड न्यूज असून याचेच प्रमोशन करताना कियारा दिसली.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये लग्न केले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा लग्नसोहळा हा अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत राॅयल स्टाईलने पार पडला.