Madhuri Dixit Income: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर, माधुरी तिच्या कुटुंबासोबत रॉयल आणि आलिशान आयुष्य जगत आहे. महिन्याला अभिनेत्री पती श्रीराम नेने यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांमध्ये कमाई करत आहे. पण आता माधुरीत्या कमाई आणखी वाढ होणार आहे. एका मोठ्या निर्णयामुळे अभिनेत्री महिन्याला लाखो रुपये कमवेल.
बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने स्वतःचा मोर्चा रियल स्टेट व्यवसायाच्या दिशेने वळवला आहे. माधुरी हिने मुंबईतील ऑफिस भाडेतत्त्वावर दिलं आहे. ज्यामुळे माधुरीला महिन्याचं जवळपास 3 लाख रुपये भाडं येणार आहे. हे ऑफिस मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असून ते एका खासगी कंपनीला भाड्याने देण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी दीक्षित अतिरिक्त उत्पन्नासाठी हे पाऊल उचलत आहे. आलिशान घर असो वा व्यावसायिक मालमत्ता – हा निर्णय उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत म्हणून घेण्यात आला आहे. माधुरीचे ऑफिस 1,594.24 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे.
सांगायचं झालं तर, माधुरीच्या उत्पन्नात दिवसागणिक वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी माधुरीने लोअर परेल येथे आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. अभिनेत्रीच्या या आलिशान घराची किंमत 48 कोटी रुपये आहे. माधुरीने 28 सप्टेंबर 2022 रोजी या मालमत्तेची नोंदणी केली होती.
53 व्या मजल्यावर असलेलं माधुरीचं हे अपार्टमेंट 5384 स्क्वेअर फूटमध्ये पसरलं आहे. अभिनेत्रीला अपार्टमेंटसह सात कार पार्किंग स्लॉटही मिळाले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये माधुरी दीक्षितने मुंबईत तीन वर्षांसाठी 12.5 लाख रुपये प्रति महिना भाड्याने घर घेतलं होतं.
माधुरी दीक्षित हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.