अंडरवर्ल्ड डॉनसोबत ममता कुलकर्णीचं लग्न? खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा

| Updated on: Dec 07, 2024 | 11:26 AM

Mamta Kulkarni on Marriage: ड्रग्स डिलरसोबत लग्न, अंडरवर्ल्डशी खास कनेक्शन... ममता कुलकर्णीने अखेर खासगी आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा... आता जगतेय असं आयुष्य..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

अंडरवर्ल्ड डॉनसोबत ममता कुलकर्णीचं लग्न? खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Follow us on

Mamta Kulkarni on Marriage: 1990 साली बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा चर्चेत आली आहे. तब्बल 25 वर्षांनंतर ममता मायदेशी परतली आहे. भारतात परतल्यानंतर झालेला आनंद अभिनेत्री सोशल मीडियावर एका व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केली आहे. याच दरम्यान अभिनेत्री भावूक देखील झाली. अभिनेत्री म्हणाली, ‘मनातील भावना व्यक्त कशा करु कळत नाही… अनेक वर्षांनंतर आपला देश पाहिला आहे आणि ती वेळ माझ्यासाठी खास होती. माझ्या डोळ्यात पाणी होतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. शिवाय नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे.

ममता हिने स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, ‘मी अद्यापही सिंगल आहे. मी विक्कीसोबत लग्न केलं नाही. तो माझा पती नाही… आज देखील मी सिंगल आहे. मी कोणासोबतच लग्न केलेलं नाही. विक्की आणि मी रिलेशनशिपमध्ये होतो. पण मी त्याला 4 वर्षांपूर्वी ब्लॉक केलं आहे..’

 

 

विक्कीबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘विक्की चांगला व्यक्ती आहे. त्याचं मन देखील चांगलं आहे. फिल्म इंडस्ट्रीमधून अनेक सेलिब्रिटी त्याला भेटण्यासाठी यायचे. पण विक्कीला भेटणारी मी चित्रपटसृष्टीतील शेवटची व्यक्ती होती. जेव्हा मला त्याचं सत्य कळले तेव्हा मी त्याला सोडलं. तो दुबईच्या तुरुंगात होता. मी त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी देखील अनेक प्रयत्न केले.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘2012 मध्ये विक्की याची तुरुंगातून सुटका झाली आणि मी त्याला 2016 मध्ये भेटली. त्यानंतर पुन्हा त्याला अटक करण्यात आली. आता विक्की माझा भूतकाळ आहे आणि मी त्याला केव्हाच सोडलं आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

सांगायचं झालं तर, 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा ममता कुलकर्णी दुबई तुरुंगात त्याला भेटायला जायची तेव्हा विक्की गोस्वामीशी तिच्या नावाची चर्चा रंगू लागली. 2016 मध्ये, विकीसह अभिनेत्री 2000 कोटी रुपयांच्या ड्रग रॅकेटच्या जाळ्यात अडकली… अखेर कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने नवा निर्णय घेऊन कुलकर्णी हिची ड्रग्ज प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.

अभिनेत्री विरोधात सबळ पुरावे नसल्यमुळे ममता कुलकर्णी हिच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. 2016 मध्ये ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या ममता कुलकर्णी हिला 2024 मध्ये दिलासा मिळाला.

ममता कुलकर्णी सिनेमे

ममता कुलकर्णी हिने अभिनेते राज कुमार आणि नाना पाटेकर यांच्यासोबत 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ सिनेमात काम केलं. त्यानंतर ममता ‘करण अर्जुन’, ‘क्रांतिवीर’, ‘वक्त हमारा है’, ‘सबसे बड़ा खिलाड़ी’ यांसारख्या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसली.