Bollywood Actress Life: बॉलिवूडमध्ये असे फार कमी सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी बोलतात. विशेषतः जेव्हा त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी असतात. बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, तिचं लग्नाच्या दोन वर्षांत घटस्फोट झालं आणि त्यानंतर अभिनेत्रीला घटस्फोटाचं निदान झालं. अभिनेत्रीने तिच्या नात्याबद्दल देखील मोठा खुलासा केला. ती 90 च्या दशकातील सर्वात यशस्वी आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती, लग्नानंतर सिनेसृष्टीपासून दूर राहिली, कॅन्सरशी लढा दिला, पण आता तिने आपल्या दमदार कमबॅकने पुन्हा लोकांची मने जिंकली आहेत. ती दुसरी तिसरी कोणी नसून मनीषा कोईराला आहे.
‘सौदागर’, ‘1942: ए लव स्टोरी’, ‘अकेले हम अकेले तुम’, ‘गुप्त’, ‘बॉम्बे’ आणि ‘खामोशी’ यांसारख्या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्यानंतर मनिषाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पण मनिषा तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली. उद्योजक सम्राट दहल याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री पुन्हा लग्न करण्याचा विचार केलाच नाही.
सांगायचं झालं तर, सम्राट आणि मनिषा यांची ओळख फेसबूकच्या माध्यमातून झाली होती. अभिनेत्रीने 19 जून 2010 मध्ये नेपाळी पद्धतीत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मनिषा हिला कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर उपचारासाठी अभिनेत्री न्ययॉर्क येथे पोहोचली. 2015 मध्ये, मनीषाने घोषणा केली की ती कर्करोगमुक्त आहे आणि तिची कारकीर्द पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे.
घटस्फोटानंतर मनिषाची सर्वांनीच साथ सोडली. फक्त कुटुंबातील जवळच्या व्यक्तींनी अभिनेत्रीला साथ दिली. अभिनेत्री म्हणाली, ‘माझं कुटुंब फार मोठं आहे. पण कठीण काळात माझ्यासोबत कोणीच नव्हतं. कुटुंबातील प्रत्येक जण श्रीमंत आहे. पण फक्त माझे आई – वडील, भाऊ आणि वहिनीने मला एकटीला सोडलं नाही. आज काहीही झालं तरी, माझ्या आयुष्यात माझ्या आई – वडिलांचं स्थान प्रथम आहे. बाकी सर्व नंतर…’ असं देखील मनिषा एका मुलाखतीत म्हणाली होती.
सांगायचं झालं तर, प्रत्येक नात्यात सतत अपयश मिळाल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा कधीच लग्नाचा विचार केला नाही. आज वयाच्या 54 वर्षी देखील अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर मनिषा कायम सक्रिय असते. सोश मीडियावर मनिषाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.