Natasa Stankovic Cryptic Post: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची पत्नी नताशा स्टेनिकोविक सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या 4 वर्षांनंतर हार्दिक – नताशा यांनी घटस्फोट घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच नताशा – हार्दिक यांनी घटस्फोटाची घोषणा केली. दोघांना एक मुलगा देखील आहे आणि आता नताशा ‘सिंगल मदर’ म्हणून मुलाचा सांभाळ करत आहे. तर दुसरीकडे, हार्दिक घटस्फोटानंतर दुसऱ्या महिलेला डेट करत असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.
सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर नताशा मुलासोबत तिच्या मायदेशी निघून गेली होती. पण आता अभिनेत्री पुन्हा भारतात आली आहे. पण नताशा अद्याप घटस्फोटाबद्दल अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून मनातील भावना व्यक्त करताना दिसत आहे. आता देखील नताशा हिने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टमध्ये नताशा नात्यामधील प्रामाणिकपणाबद्दल बोलताना दिसत आहे. नताशा म्हणाली, ‘तुमच्या पाठीमागे असलेली निष्ठा ही खरोखरच सर्वोच्च उत्तम दर्जा आहे…’, याआधी देखील नताशा हिने अशा अनेक पोस्ट केल्या आहे. ज्यामुळे हार्दिक याने नताशाची फसवणूक केली अशी देखील चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
दरम्यान, नताशा हिला घटस्फोट दिल्यानंतर हार्दिक अभिनेत्री आणि ब्रिटिश सिंगर जास्मिन वालिया हिला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. पण यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. जास्मिन आणि हार्दिक सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करतात.
हार्दिक पांड्या – नताशा स्टँकोव्हिच यांना 2020 मध्ये साध्या पद्धतीत लग्न करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. 31 मे 2020 मध्ये दोघांनी कोर्टमॅरिज केलं. लग्नाच्या 2 महिन्यांनंतर दोघांनी मुलाचं जगात स्वगत केलं.त्यानंतर 2023 मध्ये हार्दिक – नताशा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. एवढंच नाहीतर, हार्दिक, नताशा हिच्या कुटुंबियांना देखील लग्नाच्या दोन वर्षांनंतर भेटला होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.