‘फॅबुलस लाइव्स वर्सेज बॉलिवूड वाइव्स’ शोचा तिसरा सिझन सुरु झाला आहे. तिसऱ्या सिझनमध्ये अभिनेता रणबीर कपूर याची बहीण रिद्धिमा कपूर सहानी, शालिनी पासी, कल्याणी साहा चावला, महीप कपूर, सीमा सजदेह, भावना पांडे आणि नीलम कोठारी देखील आहेत. नीलम हिचं पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न अभिनेता समीर सोनी याच्यासोबत केलं. अभिनेत्रीच्या पहिल्या पतीचं नाव ऋषी सेठिया असं आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने धक्कादायक अनुभव सांगितला. शिवाय मुलीबद्दल देखील अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.
नीलम कोठारी हिच्या मुलीला घटस्फोटाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलं. ज्यामुळे अभिनेत्रीच्या मुलीला मोठा धक्का बसला. ‘घरी परतल्यानंतर अहाना तिच्या मैत्रिणींसोबत होती. ती कायम घरात गोंधळ घालत असते. पण तेव्हा ती शांत होती. अहाना माझ्या जवळ आली आणि तिने मला विचारलं, ‘तुझा घटस्फोट झाला आहे?’
पुढे नीलम म्हणाली, ‘अहानाला काय सांगू मला कळत नव्हतं तिला सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते. मी तिला विचारलं, तुला याबद्दल कसं माहिती झालं? माझी लेक मला म्हणाली, तू सेलिब्रिटी आहेस. त्यामुळे माझ्या मित्रांनी तुझ्याबद्दल गुगलवर माहिती सर्च केली तेव्हा मला कळलं… माझ्या मुलीला घटस्फोटाबद्दल अशा प्रकारे माहिती पडावं… अशी माझी इच्छा कधीच नव्हती.’ असं अभिनेत्री म्हणाली.
घटस्फोटावर बोलताना अभिनेत्री भावूक झाली. शिवाय तिच्या डोळ्यातून पाणी देखील आलं. ‘लग्नानंतर मी परदेशात गेली. मला भारतीय कपडे घालावे लागतील आणि मांसाहार सोडावा लागेल असं सांगण्यात आलं. पण दारु पिण्यावर बंदी केली होती. सर्वकाही करण्यास मला काहीही हरकत नव्हती… माझ्या मते काही तर स्वतःचं नाव देखील बदलतात. पण नाव बदलण्यावर मी सहमत नव्हती…’
‘अशा पातळीवर पोहोचली जेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारला… मी असं का होऊ देत आहे? मी सुपरमार्केटमध्ये जायची किंवा हॉटेलमध्ये जायची तेव्हा मला अनेक जण विचारायचे ‘तुम्ही नीलम आहात का?’ मला नकार द्यावा लागत होता… हा अनुभव माझ्यासाठी त्रासदायक होता. ज्यामुळे घर सोडण्याचा निर्णय घेतला.’ असं म्हणत नीलम हिने खंत व्यक्त केली.