बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. परिणीती चोप्रा हिने खासदार राघव चड्ढा याच्यासोबत अत्यंत खास पद्धतीने राजस्थानमध्ये लग्न केले. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. हेच नाही तर पहिल्याच भेटीमध्ये राघव चड्ढा आणि परिणीती चोपा हे एकमेकांच्या प्रेमात पडले.
परिणीती चोप्रा हिचा काही दिवसांपूर्वीच अमर सिंह चमकीला हा चित्रपट रिलीज झाला. सध्या परिणीती चोप्रा ही कामाच्या शोधात असल्याचे सांगितले जातंय. राघव चड्ढा याच्यावर काही दिवसांपूर्वीच विदेशात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी पतीची काळजी घेण्यासाठी परिणीती चोप्रा ही देखील विदेशात गेली होती.
सध्या परिणीती चोप्रा हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओच्या माध्यमातून परिणीती चोप्रा हिने स्पष्ट केले की, ती लाईव्ह पद्धतीने कशी राघव चड्ढा याच्या संपर्कात असते. आता परिणीती चोप्रा हिचा हाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
परिणीती चोप्रा ही विदेशात लंडनमध्ये असून राघव चड्ढा हा भारतात आलाय. परिणीती चोप्रा हिने व्हिडीओमध्ये अगोदर स्वत:ला दाखवले आहे आणि समोर असलेल्या स्क्रीनवर ती राघव चड्ढा याला दाखवत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राघव चड्ढा हा संसदेमध्ये बोलत आहे. याप्रकारे आपण लाईव्ह पद्धतीने राघव चड्ढासोबत कनेक्ट राहत असल्याचे तिने म्हटले आहे.
राघव चड्ढा याला विदेशात परिणीती चोप्रा ही मिस करत असल्याचे या व्हिडीओवरून दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एक चर्चा तूफान रंगताना दिसली की, परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याच्यासोबतच्या लग्नानंतर अभिनय करणार नाहीये. ती कोणत्याही चित्रपटात काम करणार नाहीये. मात्र, तसा खुलासा हा परिणीती चोप्रा हिच्याकडून करण्यात आला नाहीये.