पंतप्रधानांचं कौतुक केलं तर भक्त, गर्वाने हिंदू आहोत म्हटलं तर…, प्रितीने झिंटाने कोणावर साधला निशाणा?

| Updated on: Feb 22, 2025 | 12:54 PM

Preity Zinta: पंतप्रधानांचं कौतुक केलं तर भक्त, गर्वाने हिंदू आहोत म्हटलं तर..., प्रिती झिंटाचं लक्षवेधी ट्विट, सीमेपलीकडे असलेल्या खास व्यक्तीबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिती झिंटाच्या ट्विटची चर्चा...

पंतप्रधानांचं कौतुक केलं तर भक्त, गर्वाने हिंदू आहोत म्हटलं तर..., प्रितीने झिंटाने कोणावर साधला निशाणा?
Follow us on

Preity Zinta: अभिनेत्री प्रिती झिंटा कायम तिच्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम छोट्या – मोठ्या मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडत असते. आता देखील अभिनेत्री एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने लोकांना सनकी म्हटलं आहे. लोकांना आता कोणत्याच विषयावर चर्चा करायची नाही, फक्त आरोप आणि संताप व्यक्त करायचा आहे. एवढंच नाही तर, सीमेपलीकडे असलेली एक व्यक्ती जी अभिनेत्रीसाठी जीव देखील देण्यासाठी तयार आहे, त्या व्यक्तीबद्दल देखील प्रितीने मोठं वक्तव्य केलं आहे.

प्रिती झिंटा म्हणाली, ‘जर कोणी AI बॉटसोबत पहिल्यांदा चॅट करत आहे तर, लोकांना वाटतं की पेड प्रमोशन करत आहे. जर तुम्ही पंतप्रधानांचं कौतुक करत असाल तर, भक्त… जर तुम्ही स्वतःला गर्वाने हिंदू आणि भारतीय म्हणत असाल तर, तुम्ही अंधभक्त…! जे काही आहे ते सत्य असायला हवं आणि लोकांना त्याच नजरेने पाहा जसे ते आहेत, तुम्हाला ती व्यक्ती कशी हवी आहे, त्या बाजूने विचार करु नका…

 

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘कदाचित आता आपल्याला शांत राहण्याची गरद आहे. फक्त एकमेकांसोबत संवाद साधून आनंदी राहाता आलं पाहिजे… आता मला असं विचारू नका, मी लग्न का केलं? मी अशा व्यक्ती सोबत लग्न केलं आहे, जी मला मी आहे तश स्वीकारण्यास तयार आहे. सीमेपलीकडे असलेली एक व्यक्ती जी माझ्यासाठी प्राण देखील देऊ शकते…’ असं देखील अभिनेत्री पती जीन गुडइनफ याच्याबद्दल म्हणाली.

प्रिती झिंटाने सोशल मीडियावर लोकांच्या वागणुकीबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं, तर तिने तिचा पती जीन गुडइनफ यांच्यावर प्रेमही व्यक्त केले. जीन गुडइनफ आणि प्रिती झिंटा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी 2016 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्री अमेरिकेत शिफ्ट झाली.

लग्नानंतर प्रितीने सरोगेसीच्या मदतीने जुळ्या मुलांचं जगात स्वागत केलं. अभिनेत्री कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. प्रिती आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.