अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना प्रियांका चोप्रा दिसते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिच्या चित्रपटाच्या सेटवर निक जोनस आणि त्याची मुलगी मालती मेरी हे पोहोचले होते. यावेळीचे काही खास फोटोही प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावर शेअर केले. कायमच आपल्या कामामधून वेळ काढून कुटुंबियांसोबत खास वेळ घालवताना प्रियांका चोप्रा ही दिसते.
निक जोनस याच्यासोबत लग्न झाल्यापासून प्रियांका चोप्रा ही विदेशात राहते. मात्र, असे असतानाही प्रियांका चोप्रा ही आपल्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते. आता मुलगी मालती मेरीसोबत खास वेळ घालवताना प्रियांका ही दिसत आहे. आता या विकेंडला मालती मेरी हिने अभिनेत्री प्रीती झिंटाच्या हिच्या मुलांसोबत धमाल केलीये.
प्रियांका चोप्रा ही निक जोनस याच्यासोबत मुलगी मालतीला घेऊन डिस्नेलँडला गेली. प्रियांका चोप्रा हिने इंस्टाग्रामवर स्टोरीवर मालती मेरी आणि प्रीती झिंटाच्या मुलांसोबतचे खास फोटो शेअर केला आहेत. या फोटोमध्ये मालती मेरी ही खेळण्यात मग्न दिसत आहे. विशेष म्हणजे प्रियांका चोप्रा हिने विकेंड फन म्हणत प्रिती झिंटा हिला देखील टॅग केले आहे.
एका फोटोमध्ये मालती ही खेळताना दिसत आहे आणि निक जोनस हा देखील मालती आणि इतर मुलांसोबत खेळण्यात बिझी दिसत आहे. मुलीसोबत धमाल करताना प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे देखील दिसत आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे जास्तीत जास्त वेळ मुलगी मालती मेरी हिच्यासोबत घालवताना दिसतात.
काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने काही खास फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये मालती मेरी आपल्या छोट्या हातांनी चक्क पोळी लाटताना दिसली. हेच नाही तर प्रियांकाने हे देखील म्हटले होते की, मी आज माझी आवडती भाजी भेंडी खात आहे. निक जोनस याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो प्रियांका चोप्रा हिची किस घेताना देखील दिसला.