मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री राणी मुखर्जी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनय क्षेत्रात पूर्वीप्रमाणे राणी सक्रिय नसली तरी, तिच्या खासगी आयुष्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. आता राणी मुखर्जी हिने तिच्या आयुष्यात आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे. बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्न 2023 मध्ये स्पीकर म्हणून सहभागी झाली होती. या फेस्टिवलमध्ये अभिनेत्रीने गर्भधारणा आणि गर्भपाताबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. राणी मुखर्जी हिचा २०२० मध्ये गर्भपात झाला आहे. पाच महिन्यांच्या गर्भधारणेनंतर तिने आपले मूल गमावलं. ही धक्कादायक घटना ‘मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमाच्या शूटिंगपूर्वी घडली होती… असं देखील अभिनेत्री म्हणाली.
फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्रीने दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल मोठा खुलासा केला आहे. ”मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान मी गर्भपाताबद्दल काहीही बोलली नाही. कारण तेव्हा काही बोलली असती, तर सिनेमाच्या प्रमोशनचा भाग म्हणून मला ट्रोल केलं असतं.’ रिपोर्टनुसार, पहिल्यांदा राणी हिने गर्भपाताबद्दल सांगितलं आहे..
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या गर्भपाताबद्दल मी कधीही व्यक्त झाली नाही. कारण याचा थेट संबंध सिनेमासोबत जोडण्यात आला असता. २०१९ मध्ये कोविड आला. २०२० मध्ये मला माझ्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल कळालं. पण प्रेग्नेंसीमध्ये मी माझ्या पाच महिन्यांच्या बाळालं गमावलं…’
‘गर्भपाताच्या १० दिवसांनंतर ‘मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमाचे निर्माते माझ्याकडे ऑफर घेवून आले. त्यांनी मला सिनेमाची कथा सांगितली आणि मी सिनेमाला नाही म्हणू शकली नाही… मी माझं बाळ गमावलं होते, त्या भावना मी अनुभवू शकत होती म्हणून नाही तर, अनेकदा योग्य वेळी सिनेमात काम करण्याची संधी मिळते. त्या प्रसंगाचा तुम्ही स्वतः सामना केला असेल…’ असं देखील राणी म्हणाली.
सिनेमाच्या कथेबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘सिनेमाची कथा ऐकल्यानंतर मला थक्का बसला. मी विचार देखील करु शकत नव्हती की, नॉर्वे सारख्या देशात भारतीय कुटुंबासोबत असं काही होवू शकेल. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान निर्माते, दिग्दर्शक कोणालाच काहीही माहिती नव्हतं. आता सत्य कळल्यानंतर ते हैराण होतील..’ असं देखील राणी मुखर्जी म्हणाली. राणी मुखर्जी स्टारर ‘मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमा १७ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित झाला. सिनेमामुळे राणी तुफान चर्चेत आली होती.