अखेर ‘त्या’ वादावर रिया चक्रवर्ती हिने सोडले माैन, थेट म्हणाली, होय मी ड्रग्ज पेडलर

| Updated on: Nov 01, 2023 | 8:53 PM

रिया चक्रवर्ती ही कायमच चर्चेत आहे. रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर आरोप करण्यात आले. आता त्यावर पहिल्यांदाच बोलताना रिया चक्रवर्ती दिसली.

अखेर त्या वादावर रिया चक्रवर्ती हिने सोडले माैन, थेट म्हणाली, होय मी ड्रग्ज पेडलर
Follow us on

मुंबई : सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती प्रचंड चर्चेत आली. रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आले. इतकेच नाही तर थेट काही दिवस जेलमध्ये राहण्याची थेट वेळ रिया चक्रवर्तीवर आली. सतत रिया चक्रवर्ती हिच्यावर सोशल मीडियावर टीका केली गेली. फक्त रिया चक्रवर्ती हिच नाही तर या प्रकरणात तिच्या भावावर देखील सातत्याने आरोप करण्यात आले आणि त्याला देखील जेलमध्ये राहण्याची वेळ आली.

नुकताच आता रिया चक्रवर्ती हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना रिया चक्रवर्ती दिसलीये. रिया चक्रवर्ती हिने थेट ट्रोलर्सची बोलती बंद केल्याचे दिसतंय. रिया चक्रवर्ती म्हणाली की, तुम्हाला जेंव्हा चुडेल, खुनी, विषकन्या, ड्रग्ज पेडलर या नावाने बोलले जाते, त्यावेळी ते ऐकल्याशिवाय तुमच्याकडे काहीच पर्याय हा नसतो.

जर लोकांना वाटतच असेल की, तुम्ही चुडेल आणि ड्रग्ज पेडलर आहात तर त्या गोष्टींचा काही काळानंतर तुमच्यावर काहीच परिणाम हा होत नाही. मुळात म्हणजे कोणी काहीही म्हटल्याने आपण काही होत नसतो. जर तुम्हाला वाटते की, मी चुडेल आहे तर ठिक आहे मग मी चुडेल आहे. जर तुम्हाला वाटते की, मी पागल आहे तर मग मी पागल आहे.

मुळात म्हणजे आता काहीच फरक पडत नाही की, तुमच्याबद्दल कोण काय बोलते याचा. ज्यादिवशी तुम्हाला अशा गोष्टींचा अजिबात फरक पडत नाही त्यादिवशी तुम्हाला लोक काय ट्रोल करत आहेत, याचाबद्दलही तुम्हाला काहीही देणे घेणे नसते. रिया चक्रवर्ती ही गेल्या काही दिवसांपासून सतत मोठे खुलासे करताना दिसतंय.

रिया चक्रवर्ती हिला सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला जबाबदार ठरवले जाते. रिया चक्रवर्ती ही आता दुसऱ्यांदा प्रेमात पडल्याचे सांगितले जातंय. रिया चक्रवर्ती ही व्यावसायिक निखिल कामथ याला डेट करत आहे, अशी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून निखिल कामथ आणि रिया हे स्पाॅट होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे निखिल कामथ हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.