राजघराण्यातील मुलीने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आणि मोठा धमाका केला. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली. मात्र, यशाच्या शिखरावर असताना असे काही घडले की, अभिनेत्रीचे करिअर खराब झाले. आता ही अभिनेत्री टीव्ही मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारताना दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून रिया सेन ही आहे. रिया सेनने आपल्या करिअरची सुरूवात वयाच्या पाचव्या वर्षी बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर तिने अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका देखील केल्या. विषकन्या सारख्या चित्रपटांमधून तिला खरी ओळख मिळाली.
विशेष म्हणजे रिया सेनचा राजघराण्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे. रिया सेन हिचे वडील भरत देव वर्मा त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. हेच नाही तर कूच बिहारच्या राजकुमारी इला देवी यांचे ते पुत्र आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचे पुतणे आहेत. सुचित्रा सेन या देखील ज्येष्ठ अभिनेत्री होत्या, त्यांची बहीण रायमा सेन देखील अभिनेत्री आहे.
अक्षय खन्ना आणि लेखक सलमान रश्दी यांच्यासोबत रिया सेन हिचे नाव जोडले गेले होते. हेच नाही तर भारताचा माजी क्रिकेटपटू श्रीशांत याला रिया सेन डेट करत असल्याचे मध्यंतरी सांगितले गेले. मात्र, रिया सेन हिचा एक एमएमएस लीक झाला आणि मोठी खळबळ निर्माण झाली. लोकांनी थेट रिया सेन हिच्यावर टीका केली आणि गंभीर आरोपही केला.
रिया सेन आणि अभिनेता अश्मित पटेल यांचा एमएमएस लीक झाला. हा एमएमएस अत्यंत खासगी होता. असा एक आरोप करण्यात आला की, रिया सेन हिने हा एमएमएस मुद्दाम लीक केला. यानंतर रिया सेनच्या करिअरचा आलेख इतका जास्त घसरला की, रिया सेन हिला काम देण्यासाठीही कोणीही पुढे आले नाही.
शेवटी रिया सेन हिने ऑगस्ट 2017 मध्ये शिवम तिवारी याच्यासोबत लग्न केले. हा विवाहसोहळा बंगाली पद्धतीने झाला. रिया सेन ही 43 वर्षांची असून अत्यंत बोल्ड दिसते. विशेष म्हणजे रिया सेन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. रिया सेन हिचा एक एमएमएस लीक झाला आणि सर्व करिअर खराब झाले.