अभिनेत्री सागरिका घाटगे ही गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. झहीर खान याच्यासोबत लग्न झाल्यापासून सागरिका घाटगे ही चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, साड्यांचा व्यवसाय अभिनेत्री करत असल्याचे सांगितले जाते. अभिनेत्री जरी पडद्यापासून दूर असली तरीही ती चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना सागरिका घाटगे दिसते. बाॅलिवूड आणि क्रिकेटचे खास नाते आहे. सागरिका घाटगे हिने 2017 मध्ये झहीर खान याच्यासोबत लग्न केले.
सागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केले आणि मग लग्नाचा निर्णय घेतला. आता सागरिका घाटगे आणि झहीर खान यांच्या लग्नाला तब्बल सात वर्षे पूर्ण झालेत. नुकताच सागरिका घाटगे हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना सागरिका घाटगे ही दिसलीये. आता अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा होताना दिसत आहे.
सागरिका घाटगे हिला बाळाच्या प्लनिंगबद्दल विचारण्यात आले. यावेळी सागरिका घाटगे म्हणाली की, होय मी आणि झहीर दोघेही आमचे कुटुंब वाढवण्यास इच्छुक आहोत. आम्ही पालकांच्या भूमिकेत येण्यासाठी खूप जास्त उत्साहीत आहोत. बाळाचे प्लनिंग करत असल्याचे सांगताना सागरिका घाटगे ही दिसली आहे. म्हणजेच काय तर यांच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे.
सागरिका घाटगे आणि झहीर खान यांच्या लग्नाला आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत. आता ते बाळाचे प्लनिंग करत आहेत. अनेक वर्षांपासून चाहते हे सागरिका घाटगे हिला बाळाच्या प्लनिंगबद्दल विचार होते. सागरिका घाटगेचे बोलणे ऐकून चाहते आनंदी झाल्याचे बघायला मिळत आहेत. सागरिका घाटगे नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे.
सागरिका घाटगे हिच्या पुनरागमनाची वाट पाहताना चाहते दिसत आहेत. मात्र, आपल्या पुनरागमनावर भाष्य करणे सागरिका घाटगे हिने टाळले आहे. सागरिका घाटगे आणि झहीर खान हे कायमच त्यांचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सागरिका घाटगे ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.