बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे सलमान खानने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सलमान खान याचे फक्त चित्रपटच नाही तर तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत असतो. सलमान खान याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. मात्र, सर्वात जास्त चर्चा झाली म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची.
ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केले. सलमान आणि ऐश्वर्या लग्न करणार सर्वांनाच वाटत होते. मात्र, एका वाईट वळणावर येऊन सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे ब्रेकअप झाले. सलमान खान याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या राय हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले.
सलमान खान याने जरी अनेक मोठ्या अभिनेत्रींना डेट केले असेल तरीही सलमान खान याच्या आईची कधीच ऐश्वर्या राय, कतरिना कैफ किंवा इतर कोणतीही अभिनेत्री पसंत नव्हती. चक्क एका टीव्ही अभिनेत्रीची चाहती सलमान खानची आई आहे. सनाया ईरानीची सलमान खानची आई मोठी चाहती आहे. याबाबतचा खुलासा स्वत: सलमान खान यानेच केला.
सलमान खान याने सनाया ईरानी हिला विचारले की, तू या अगोदर कधी टीव्हीमध्ये काम केले आहे का? यावर सनाया ईरानी हो म्हणाली. यावर सलमान खान हा म्हणावा की, माझी मम्मी तुझी खूप जास्त मोठी चाहती आहे. हे सांगताना सलमान खान हा लाजताना देखील दिसला. सलमान खानचे बोलणे ऐकून सनाया ईरानी ही हसते.
सनाया ईरानी हिने अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सनाया ईरानीला खरी ओळख ही इस प्यार को क्या नाम दूं मालिकेतून मिळाली. या मालिकेत ती खुशी पात्र साकारत होती. या पात्राला प्रेक्षकांनी प्रेम दिले. सनाया ईरानी ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सनाया ईरानी ही कायमच दिसते.