सारा अली खान की सारा तेंडुलकर दोघींपैकी अधिक श्रीमंत कोण?

| Updated on: Dec 19, 2024 | 3:26 PM

Sara Ali Khan and Sara Tendulkar: सैफ अली खानची लेक सारा सचिन तेंडुलकर यांची लेक सारा दोघींपैकी कोण आहे अधिक श्रीमंत, कोणाची नेटवर्थ अधिक?... दोघी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

सारा अली खान की सारा तेंडुलकर दोघींपैकी अधिक श्रीमंत कोण?
Follow us on

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची लेक सारा अली खान हिने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. तर भारताचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सारा तेंडुलकर अभिनेत्री नसली तरी तिच्याबद्दल अनेक चर्चा सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सारा तेंडुलकर हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण सारा तेंडुलकर हिला कायम बॉलिवूड सेलिब्रिटी आणि स्टारकिड्ससोबत स्पॉट केलं जातं.

एवढंच नाही तर, सारा तेंडुलकर आणि सारा अली खान यांचं देखील एकमेकींसोबत कोणतंच कनेक्शन नाही. पण काही कारणांमुळे दोघी कायम चर्चेत असतात. तर सारा तेंडुलकर की सारा अली खान कोण अधिक श्रीमंत आहे? अशा चर्चा देखील सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

सांगायचं झालं तर, सारा अली खान हिने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिलं नाही. अभिनेत्रीने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. रिपोर्टनुसार सारा अली खान हिची संपत्ती 41 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार, सारा अली खान एका सिनेमासाठी जवळपास 5 – 7 कोटी रुपये मानधन घेते. सोशल मीडिया शिवाय अभिनेत्री जाहिराती आणि कार्यक्रमांमधून देखील बक्कळ पैसा कमावते. सोशल मीडियावर देखील सारा अली खान कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

सारा तेंडुलकर हिची संपत्ती…

रिपोर्टनुसार, सारा तेंडुलकर ही रिपोर्टनुसार 1 कोटी रुपयांची मालकीण आहे. सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. सारा अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सारा हिच्या प्रत्येक पोस्टवर फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.