मुंबई : सैफ अली खान याची लेक सारा अली खान (Sara Ali Khan) ही नेहमीच चर्चेत राहते. सार अली खान आणि विकी काैशल यांचा चित्रपट आजच रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान ही दिसली होती. सारा अली खान ही काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे (Movie) प्रमोशन करत असताना अजमेर शरीफ दर्गामध्ये गेली होती. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही दिवसांपूर्वीच राजस्थान येथे विकी काैशल याच्यासोबत धमाल करताना सारा अली खान ही दिसली होती. सारा हिचे काही गुपिते उघड करताना देखील विकी काैशल (Vicky Kaishal) हा दिसला होता. सारा तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते.
चित्रपटाचे प्रमोशन करताना सारा अली खान ही अनेक मंदिरांमध्ये दर्शन घेताना दिसली. याचे अनेक फोटोही व्हायरल झाले. मात्र, मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेल्यामुळे सतत सारा अली खान हिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. सारा अली खान हिचे मंदिरात जाणे काही लोकांना अजिबातच आवडले नसल्याचे दिसत आहे.
इतकेच नाही तर अनेकांनी तिला थेट कमेंट करत तिच्या धर्माबद्दल देखील विचारले आहे. मात्र, असे नाही की, सारा अली खान ही पहिल्यांदा कोणत्या मंदिरात वगैरे गेली आहे. जर आपण सारा अली खान हिचे इंस्टाग्राम चेक केले तर आपल्या लक्षात नक्कीच येईल, की सारा अली खान ही अनेकदा यापूर्वी हिंदू मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलीये.
गुरुद्वारा, मंदिरे आणि दर्गात सारा अली खान ही नेहमीच जाते. अनेकांनी थेट म्हटले आहे की, सारा अली खान ही मुस्लीम असून हिंदू मंदिरामध्ये नेमकी कशी जाते. सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. साराची आई हिंदू असल्यामुळे सारा मंदिरात जात असल्याचे सांगितले जाते. सारा दर्गात देखील कायमच जाते.
अमृता सिंह यांनी सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर धर्म बदलला होता. सारा अली खान ही बिनधास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान हिचे नाव हे क्रिकेटर शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात आहे. सारा अली खान ही काही दिवसांपूर्वीच मुंबईत रिक्षाने प्रवास करताना दिसली होती. सारा सोशल मीडियावरही सक्रिय असते.