मुंबई : थॅंक यू फॉर कमिंग या चित्रपटामुळे शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही जोरदार चर्चेत आहे. शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅस 13 (Bigg Boss 13) मधून मिळालीये. शहनाज गिल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शहनाज गिल हिने बिग बाॅसच्या घरात मोठा धमाका केला. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांच्या जोडीला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले. शहनाज गिल आणि सिद्धार्थची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली.
शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅस 13 मधूनच मिळालीये. शहनाज गिल हिने किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. विशेष म्हणजे या चित्रपटातून शहनाज गिल हिच्यासोबतच पलक तिवारी हिने देखील बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. मात्र, यांच्या अभिनयाचे फार काही काैतुक करण्यात नाही आले.
शहनाज गिल हिचा आता थॅंक यू फॉर कमिंग हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामुळे शहनाज चर्चेत आहे. नुकताच आता शहनाज गिल हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना शहनाज गिल दिसलीये. शहनाज गिल ही तिच्या विधानांमुळे अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील येते.
शहनाज गिल म्हणाली की, मी ज्यावेळी कमेंट पाहते त्यावेळी काही लोक माझे काैतुक करताना दिसतात तर दुसरीकडे काही लोक माझ्या कपड्यांवरून मला जज करताना दिसतात. मात्र, मला काही लोकांना हे नक्कीच सांगावे वाटते की, सूट घालणाऱ्या महिला चांगल्या आणि ज्या लहान कपडे घालतात त्या महिला चारित्र्यहीन असतात हे चुकीचे आहे.
तुम्ही लहान कपडे देखील सुंदरपणे घालू शकता. आपण आपले विचार बदण्याची गरज आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटानंतर शहनाज गिल हिच्याकडे बाॅलिवूड चित्रपटांच्या मोठ्या प्रमाणात आॅफर आहेत. आता या थॅंक यू फॉर कमिंग या चित्रपटात शहनाज गिल ही काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.