अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 17 तासांपूर्वी श्रद्धा हिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. अभिनेत्रीने पोस्ट केलेला व्हिडीओ आता पर्यंत तब्बल 8 मिलियल लोकांनी पाहिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्ध हिच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओमध्ये श्रद्धा प्रचंड आनंदी दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री 2024 मध्ये आतापर्यंत काय – काय केलं… याची झलक दाखवली आहे.
व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘2024 अर्ध संपलं,,, यंदाच्या वर्षी आतापर्यंत तुम्ही काय-काय केलं सांगा?’ असं अभिनेत्रीने चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. चाहते देखील श्रद्धाच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, श्रद्धआ गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. श्रद्धाचं नाव राहुल मोदीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
एवढंच नाही तर, अनंत अंबनी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी देखील श्रद्धा आणि राहुल यांनी एकत्र एन्ट्री घेतली. तेव्हापासून दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. अशात श्रद्ध लग्न कधी करणार? असा प्रश्न देखील चाहते कायम अभिनेत्रीला विचारत असतात.
श्रद्धा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.