अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या श्वेता तिवारी हिने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. श्वेता हिने फक्त मालिकांमध्येच नाहीतर, सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. शिवाय अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्री आयटम सॉन्ग्स देखील केले आहे. सध्या श्वेता हिचा नव्या खासदारासोबत डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील व्हायरल व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
श्वेता तिवारी हित्यासोबत दिसणारा खासदार दुसरे तिसरे कोणी तर बिहार येथील हाजीपूर मतदारसंघाचे खासदार चिराग पासवान आहेत. सांगायचं झालं तर, बिहारमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या लोक जनशक्ती पक्षाचे (आर) नेते चिराग पासवान सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. त्यांचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आता देखील चिराग पासवान यांचा श्वेता तिवारी हिच्यासोबत एका व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे ‘कट्टो गिलहरी छमक छल्लो रानी…’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे गाणं ‘मिले ना मिले हम’ सिनेमातील आहे. सिनेमा 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता.
सांगायचं झालं तर, राजकारणात येण्यापूर्वी चिराग पासवान यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेत्री कंगना रनौत यांच्यासोबत चिराग यांनी पहिल्या सिनेमात काम केलं. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. पण आता सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात चिराग पासवान मंत्री होत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी ज्या प्रकारे काम केले त्याचं हे फळ आहे. निवडणुकीत पासवान यांच्या पक्षाने सर्व जागा लढवल्या आणि जिंकल्या देखील… सध्या सर्वत्र चिराग पासवान यांची चर्चा सुरु आहे.
रविवारी होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, तर चिराग पासवान देखील मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त चिराग पासवान यांची आणि त्यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंची चर्चा रंगली आहे.