‘माहेरी प्रेम मिळालं, सासरी मात्र…’, सोनाक्षी सिन्हाला लग्नानंतर सासू – सासरे कशी देतात वागणूक?

| Updated on: Mar 31, 2025 | 9:25 AM

Sonakshi Sinha on her relationship with inlaws: मुस्लिम मुलासोबत लग्न केल्यानंतर सासरी कसं आयुष्य जगतेय सोनाक्षी सिन्हा, सासू - सासरे कशी देतात वागणूक? म्हणाली, 'माहेरी प्रेम मिळालं, सासरी मात्र...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

माहेरी प्रेम मिळालं, सासरी मात्र..., सोनाक्षी सिन्हाला लग्नानंतर सासू - सासरे कशी देतात वागणूक?
Follow us on

Sonakshi sinha on her relationship with inlaws: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यानंतर सोनाक्षी कायम तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर झहीर याच्यासोबत फोटो पोस्ट करत सोनाक्षी नवऱ्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसते. नुकताच झालेल्या लाईव्हमध्ये सोनाक्षीने सासू – सासऱ्यांसोबत असलेल्या नात्यावर देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

लाईव्ह सेशन दरम्यान, एका चाहत्यांने अभिनेत्रीला विचारलं आई – वडिलांचं घर आणि सासरी काय अंतर वाटतो? यावर अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या आई – वडिलांकडे माझे प्रचंड लाड झाले आहे. मला प्रेमाने वाढवलं आहे. तर सासरी देखील प्रत्येक जण माझ्यावर प्रचंड प्रेम करतं. ज्यामुळे मला त्यांची मुलगी असल्यासारखं वाटतं…’

 

 

पुढे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणाली, ‘सासरी मला एका मुलीपेक्षा देखील अधिक प्रेम मिळतं. मला असे वाटते की मी खरोखरच भाग्यवान आहे की मला असं सासर मिळालं आहे. माझ्या सासरचा प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी आली आहे. ज्यामुळे ते स्वतः एक पाऊल पुढे टाकत मझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. त्यामुळे मला असं वाटतं याच घरात माझा जन्म झाला आहे. मी याच घरची लेक आहे… असं मला वाटतं.’ सध्या सर्वत्र सोनाक्षीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सोनाक्षी आणि झहीर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या वर्षी जून महिन्यात सोनाक्षी आणि झहीर यांनी कुटुंबिय आणि ठाराविक लोकांच्या उपस्थित लग्न केलं. तब्बल 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीर यांनी एकमेकांसोबत लग्न केलं.

सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो देखील तुफान व्हायरल झाले. सोनाक्षी आणि झहीर कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात. चाहत्यांना देखील दोघांची जोडी प्रचंड आवडते. सोनाक्षीच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.