बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत दिसते. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा हिने मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही सोनाक्षी सिन्हा दिसते. सध्या सोनाक्षी सिन्हा ही तिच्या हीरामंडी या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. हीरामंडीमध्ये धमाकेदार भूमिकेत सोनाक्षी सिन्हा दिसत आहे. आता सोनाक्षी सिन्हाकडून मोठा खुलासा करण्यात आलाय.
नुकताच सोनाक्षी सिन्हा हीरामंडीच्या टीमसोबत कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचली. यावेळी काही मोठे प्रश्न विचारण्यात आले. यावेळी सोनाक्षी सिन्हा हिला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. सोनाक्षी सिन्हाला लग्न कधी करणार विचारण्यात आले. यावेळी खास उत्तर देताना सोनाक्षी सिन्हा ही दिसली आहे. सोनाक्षी सिन्हाने यासोबत खंत व्यक्त केलीये.
लग्नाचा प्रश्न विचारताच सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, जले पर नमक छिडकत आहात. अर्चना पूरण सिंह हिच्याकडे बघत सोनाक्षी सिन्हा म्हणते की, कपिलला माहिती आहे की, मला लग्न किती धुमधडाक्यात करायचे आहे ते….आम्ही हीरामंडीची शूटिंग पूर्ण केलीये. मात्र, तरीही अजून माझे लग्न नाही झाले.
पुढे सोनाक्षी सिन्हा म्हणाली, शर्मिनचे लग्न झाले. यावेळी कपिल शर्माच्या शोमध्ये आपले लग्न झाले नसल्याचे दु:ख व्यक्त करताना सोनाक्षी सिन्हा दिसली आहे. आता हे बघण्यासारखे ठरेल की, सोनाक्षी सिन्हा कधी लग्न करते. सोनाक्षी सिन्हा हिला गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.
अभिनेता झहीर इक्वाल रतन्सी याला सोनाक्षी सिन्हा डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसत आहे. झहीरने सोनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कॅप्शनमध्ये ‘आय लव्ह यू’ असे लिहिले होते. हेच नाही तर मध्यंतरी चर्चा होती की, झहीर इक्वाल रतन्सी याच्यासोबतच सोनाक्षी सिन्हा ही लग्न करणार आहे. मात्र, त्यावर खुलासा हा होऊ शकला नाहीये.