अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाने सात वर्षांच्या रिलेशननंतर झहीर इक्बाल याच्यासोबत मुंबईत लग्न केले. लग्नानंतर खास पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार पोहोचले होते. विशेष म्हणजे सलमान खान, अनिल कपूर सारखे मोठे स्टार या पार्टीत सहभागी झाले. हेच नाहीतर आपल्याच लग्नात धमाल करताना सोनाक्षी सिन्हा दिसली. पती झहीर इक्बाल याच्यासोबत खास डान्स देखील लग्नात सोनाक्षी सिन्हा हिने केला. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला 14 दिवस पूर्ण झाली आहेत. यामध्येच आता सोनाक्षी सिन्हा हिला तिच्या घरच्यांची प्रचंड आठवण आलीये. सोनाक्षी सिन्हा हिने इंस्टाग्राम स्टोरीवर काही खास फोटो शेअर केले आहेत. सोनाक्षी सिन्हाने शेअर केलेले हे फोटो तिच्या लग्नातील आहेत आणि तिचे आई वडील फोटोंमध्ये दिसत आहेत.
हे फोटो शेअर करताना अत्यंत खास असे कॅप्शन देखील सोनाक्षी सिन्हा हिने दिले. सोनाक्षी सिन्हा हिने शेअर केलेले हे फोटो तिच्या बिदाईमधील असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये पूनम सिन्हा या भावनिक झाल्या आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचा चेहरा देखील बरेच काही सांगून जाताना दिसत आहे.
सोनाक्षी सिन्हा हिने हे फोटो शेअर करत लिहिले की, लग्नात आई रडत होती, त्यांना वाटत होते की मी त्यांचे घर सोडून दुसऱ्यांच्या घरात जात आहे. मी त्यांना म्हटले की, तुम्ही चिंता करू नका. जुहू आणि बांद्रा 25 मिनिटांचे अंतर आहे. मी आज त्या सर्वांना खूप जास्त मिस करत आहे. त्यामुळेच मी माझ्या मनाला आज समजावत आहे.
आज रविवारी घरी सिंधी कढी नक्कीच बनली असेल. आता सोनाक्षी सिन्हा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा हिला लग्नानंतर तिच्या आई वडिलांच्या घराची आठवण येत आहे. सोनाक्षी सिन्हा ही चांगलीच चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसत आहे.