Karwa Chauth 2024: देशभरात आज करवा चौथचा उत्साह दिसून येत आहे. करवा चौथच्या दिवशी विवाहित महिला त्यांच्या पतीच्यी दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रर्थना आणि व्रत ठेवतात. एवढंच नाही तर, महिला पूजेसाठी संपूर्ण साज शृंगार देखील करतात. बॉलिवूडमध्ये देखील अनेक अभिनेत्री पतीसाठी वृत ठेवतात. यंदाच्या वर्षी अनेक अभिनेत्रींचा पहिला करवा चौथ आहे… अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील लग्नानंतर करवा चौथ साजरा करत आहे.
सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 मध्ये लॉग्न टाईम बॉयफ्रेंड झहीर इक्बाल सोबत रजिस्टर्ड पद्धतील लग्न केलं. आता अभिनेत्री लग्नांतर पहिल्यांदा करवा चौथ साजरी करत आहे. अभिनेत्री नवऱ्यासाठी व्रत ठेवलं आहे. ज्यासाठी अभिनेत्री नव्या नवरी प्रमाणे तयार देखील झाली आहे. अभिनेत्री स्वतःचे काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर तीन फोटो पोस्ट केले आहेत. लाल साडी, सिंदूर आणि मंगळसूत्र, लाल टिकली… लूकमध्ये अभिनेत्री नव्या नवरीसारखी दिसत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.
करवा चौथच्या मुहूर्तावर खास लूकमध्ये फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये, ‘तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना… प्रत्येक दिवसाठी करवा चौथच्या शुभेच्छा…’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीची पोस्ट आवडली आहे.
सोनाक्षीच्या पोस्टवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यापासून अभिनेत्री चर्चेत आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. जवळपास 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.