अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न नुकताच झाले. या लग्नाचे नियोजन गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. विशेष म्हणजे जोरदार तयारी या लग्नाची करण्यात आली. देशच नाहीतर विदेशातूनही लोक या लग्नात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. आता या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शनही जोरदार पद्धतीने साजरे करण्यात आले. बॉलिवूड कलाकार तर या लग्नामध्ये वरातीच बनले होते. कोणी स्टेजवर डान्स करताना दिसले तर कोणी चक्क अनंतच्या वरातीमध्ये डान्स करताना दिसले.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा आणि दोन्ही मुले लव आणि कुश हे देखील पोहोचले. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा हिचे देखील लग्न झाले. मात्र, लव आणि कुश हे सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात दिसले नाहीत. त्यांनी बहिणीच्या लग्नात पाठ फिरवली. मात्र, दुसरीकडे अनंतच्या लग्नात दोन्ही भाऊ दाखल झाले.
लव आणि कुश आईसोबत पोहोचले. विशेष म्हणजे फोटोसाठी खास पोझ देतानाही लव आणि कुश दिसले. आता लव आणि कुशचे फोटो व्हायरल होत असताना अनेकांनी म्हटले की, बहीण सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात न येणार अंबानींच्या लग्नात कसे काय दाखल झाले? लोक हे फोटो पाहून हैराण झाल्याचे देखील बघायला मिळतंय.
सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. मात्र, तिच्या लग्नात दोन्ही भाऊ उपस्थित नव्हते. सुरूवातीपासूनच सांगितले जात होते की, सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाला सिन्हा कुटुंबियांचा विरोध आहे. लग्नात सही करत असताना सोनाक्षी सिन्हा हिच्या शेजारी तिचे आई वडील दिसले.
हेच नाहीतर सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर चक्क तिच्या सासऱ्यांच्या विरोधात एक पोस्ट सोशल मीडियावर भाऊ लव याने शेअर केली होती. ती पोस्ट पाहून विविध चर्चा या रंगल्या होत्या. मात्र, अगदी काही वेळातच लवने ती पोस्ट डिलीट केली. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी तब्बल 7 वर्षे एकमेकांना डेट केले आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.