बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमुळे मुख्य भूमिका केल्या आहेत. सोनाक्षी सिन्हाने 23 जून रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध असल्याची तूफान चर्चा होती. मात्र, लग्नामध्ये मुलीच्यासोबत शत्रुघ्न सिन्हा हे दिसले.
हेच नाही तर सही करताना सोनाक्षी सिन्हा हिने वडिलांचा हात पकडल्याचे फोटोंमध्ये स्पष्ट दिसत होते. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला सिन्हा कुटुंबियांचा विरोध होता. मात्र, मुलीच्या हट्टासमोर शत्रुघ्न सिन्हा झुकल्याचे सांगितले जाते. काही फोटोंमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचा चेहरा बरेच काही सांगून गेला.
हेच नाहीतर लग्नाच्या अगोदरच्या कार्यक्रमांना सोनाक्षी सिन्हा हिचे भाऊ लव आणि कुश दिसले नाहीत. लग्नामध्ये लव आणि कुश सहभागी झाले. मात्र, भावाच्या कोणत्याही विधी पुर्ण करताना दोघेही दिसले नाहीत. म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा जरी लग्नासाठी राजी झाले, तरीही दोन्ही भावांची नाराजी लग्नात देखील दिसत होती.
सध्या सोनाक्षी सिन्हा हिचा भाऊ लव याची एक जुनी मुलाखत तूफान चर्चेत आलीये. या मुलाखतीमध्ये लव हा सोनाक्षी सिन्हा हिच्याबद्दल बोलताना दिसला. हेच नाही तर तिला लोक ओळखता येत नसल्याचे देखील त्याने थेट मुलाखतीमध्ये म्हटले आहे. बहिणीला सल्ला देतानाही लव हा दिसतोय.
लव सिन्हा म्हणाला की, माझ्या बहिणीला रातोरात यश मिळाले. त्यामध्येही तिला तुम्ही लोक सारखेच घेरतात. मुळात म्हणजे प्रत्येकजण आपल्याला फायदा कसा होईल, याकडे लक्ष देतो. मी माझ्या बहिणीला खूप काही नक्कीच सांगू शकत नाही. कारण तिचे स्वत:चे एक आयुष्य आहे. मी तिला फक्त हेच सांगू इच्छितो की, कोण चांगले आणि कोण वाईट हे तिने ओळखावे.
मला तिच्याबद्दल काळजी वाटते म्हणून तिला हा सल्ला देऊ इच्छितो. मुळात म्हणजे एखाद्या व्यक्तीला विहिरीत उडी मारण्यापासून तुम्ही रोखू शकता. पण जर एखाद्याला उडी मारायचीच असेल तर त्याला कोणीच रोखू शकत नाही, तो उडी मारेलच. कोणते लोक चांगले आणि कोणते वाईट हे सोनाक्षीला समजत नाही, असेही लव म्हणाला. सोनाक्षी बनावटी लोकांना पटकन ओळखू शकत नाही.