शत्रुघ्न सिन्हा यांचे व्याही प्रसिद्ध व्यापारी, ‘या’ अभिनेत्यासोबत खास कनेक्शन ते मुंबईमध्ये…

| Updated on: Jun 21, 2024 | 7:09 PM

शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या चांगलीच चर्चेत आलीये. सोनाक्षी सिन्हा ही लवकरच झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करतंय. विशेष म्हणजे हळदीचा कार्यक्रम देखील झालाय. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे एकमेकांना काही वर्षांपासून डेट करत होते.

शत्रुघ्न सिन्हा यांचे व्याही प्रसिद्ध व्यापारी, या अभिनेत्यासोबत खास कनेक्शन ते मुंबईमध्ये...
sonakshi sinha and shatrughan sinha
Follow us on

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या चांगलीच चर्चेत आलीये. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा ही 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करत आहेत. या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी यांचे लग्न अगदी खासगी पद्धतीने होणार असल्याची चर्चा असून लग्नाच्यानंतर शेवटी जंगी पार्टीचे आयोजन केले जाईल. झहीर इक्बाल हा अभिनेता आहे. मात्र, तो सोनाक्षी सिन्हा इतका जास्त फेमस नक्कीच नाहीये. झहीर इक्बाल हा मुंबईचा रहिवासी आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांचे होणारे व्याही आणि झहीर इक्बाल याचे वडील खूप मोठे व्यापारी आहेत. सोनाक्षी सिन्हा हिच्या सासऱ्याचे नाव इक्बाल रतनसी असून त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. इक्बाल रतनसी हे प्रसिद्ध ज्वेलर्स आणि व्यापारी आहेत. इक्बाल रतनसी रिअल इस्टेट मार्केटमध्येही गुंतवणूक करतात. मोठ्या संपत्तीचे ते मालक आहेत.

यासोबतच इक्बाल रतनसी ते स्टेल्मॅक डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आहेत. इक्बाल रतनसी यांनी ब्लॅक स्टोन हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली. फक्त हेच नाही तर सलमान खान आणि इक्बाल रतनसी यांचे अत्यंत जवळचे नाते आहे. इक्बाल रतनसी यांनी सलमान खान याला खूप जास्त मदत केलीये.

सलमान खान याच्या चांगल्या आणि वाईट काळात इक्बाल रतनसी हे सलमान खानसोबत होते. झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. शेवटी आता झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा लग्न करत आहेत. कालच सोनाक्षी सिन्हा हिला झहीर इक्बाल याच्या नावाची हळद लागलीये.

काल शत्रुघ्न सिन्हा हे आपल्या जावयाला भेटण्यासाठी पोहचले होते. हेच नाही तर शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले की, मुलीच्या लग्नाला ते उपस्थित राहणार आहेत. मध्यंतरी एक चर्चा जोरदार रंगताना दिसली ती म्हणजे शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा हा सोनाक्षी हिच्या लग्नाच्या निर्णयानंतर नाराज आहेत.